सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे फुंकणार जळगाव काँग्रेसमध्ये जाण - Praniti Shinde, MLA from Solapur, will be joining Jalgaon Congress | Politics Marathi News - Sarkarnama

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे फुंकणार जळगाव काँग्रेसमध्ये जाण

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 मे 2021

मदार प्रणिती शिंदे या काँग्रस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारी आहेत. काल त्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर होत्या. जळगाव जिल्हा शासकीय विश्राम गृहात त्यानी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

जळगाव : सोलापूर येथील काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनी आज जळगाव जिल्हा काँग्रेसला बळकट करून पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार केला आहे. (Praniti Shinde, MLA from Solapur, will be joining Jalgaon Congress)

आमदार प्रणिती शिंदे या काँग्रस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारी आहेत. काल त्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर होत्या. जळगाव जिल्हा शासकीय विश्राम गृहात त्यानी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

या वेळी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, माजी खासदार उल्हास पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या माध्यमातून कामे करण्याबाबत तक्रारी केल्या, त्यानी या कार्यकर्त्यांच्या शंकाचे निरसन केले. 

या वेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, की जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाची काही पदे रिक्त आहेत. येत्या आठ दिवसात पदे भरण्यात येतील, त्यानंतर सर्व जण जोमाने कार्य करून पक्षाला जिल्ह्यात बळकट करण्यासाठी कटिबद्ध असतील. जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेस पक्षाचे मोठे वैभव होते ते पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

हेही वाचा..

राम शिंदेंनी आतापर्यंत काय केले

जळगाव जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेस पक्षाचे दोन खासदार आठ आमदार असे वैभव होते मात्र आता केवळ शिरीष चौधरी हे रावेर मतदार संघाचे एकमेव आमदार आहेत.
उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हणून आज बैठक घेवून आमदार प्रणिती शिंदे यांनी पक्षात जाण फंकण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे आगामी काळात पक्ष बळकटीची कार्यकर्त्यांना आशा निर्माण झाली आहे.
 

हेही वाचा...

खासदार लोखंडे यांच्या प्रयत्नातून 80 लाख मंजूर

अकोले : शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास खात्याच्या वैशिष्ठ पूर्ण योजनेतून अकोले नगर  पंचायत योग भवनासाठी 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत, तर प्रभाग एक मधील माळीझाप येथील रस्त्यासाठी नगरसेवक प्रमोद मंडलिक यांच्या पाठपुराव्याने रु. 20 लाख मंजुर झाले असून याबाबत खा. लोखंडे यांचे अभिनंदन होत आहे. 

लोखंडे यांनी नुकतीच अकोल्यात भेट देऊन मार्गदर्शन करतांना सांगितले की अकोले हा आदिवासी तालुका असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या जास्तीत जास्त योजना तालुक्यासाठी आणण्याचा माझा प्रयत्न आहे. सध्या कोविड ची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अकोल्यात योग भवन व्हावे, यासाठी 80 लाखाचा निधी मंजूर केला आहे. तसेच अकोल्यासाठी गार्डन व जॉगिंग ट्रॅक करण्यासाठी देखील संबंधीत खात्याशी मी पाठपुरावा करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख