पोलिस बंदोबस्तात ऑक्सिजन टँकर लातुरात

लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे.
Oxijan.jpg
Oxijan.jpg

लातूर : काही दिवसांपासून शहरात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सध्या ऑक्सिजन ठिकठिकाणाहून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. यात बेल्लारी (कर्नाटक) येथून गुरुवारी (ता. २२) महसूल अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात ऑक्सिजनचे दोन टँकर येथे आणले. यातील एक टँकर हिंगोलीला पाठवण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे तुटवडा जाणवत आहे. जिल्हा प्रशासन सातत्याने ऑक्सिजन आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी नायब तहसीलदार सुभाष कानडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक बेल्लारी येथे बुधवारी पाठवण्यात आले होते. त्यांच्यासोबत एक पोलिस व्हॅनही बंदोबस्तासाठी देण्यात आली होती. बेल्लारी येथून एक १८ टन व दुसरे १७ टन ऑक्सिजन घेऊन नॉनस्टॉप हे पथक गुरुवारी दुपारी पाच वाजता येथे पोचले. यातील १७ टनाचे टँकर हिंगोलीला पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी १८ टन ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

अन् वाटेत आले वडिलांच्या निधनाचे वृत्त

बेल्लारी येथून आलेल्या दोन पैकी एका टँकरवर संदीप कदम हे चालक होते. ते मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळचे रहिवासी आहेत. ऑक्सिजनचा टँकर घेऊन येत असताना वाटेतच त्यांना वडिलांच्या निधनाची बातमी कळाली. त्यांच्यावर कोसळलेले हे मोठे दुःख होते. पण, या प्रसंगाला धैर्याने सामोरे जात त्यांनी लातूरच्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी पहिल्यांदा हा ऑक्सिजनचा टँकर येथे आणून सोडला. त्यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांना एक वाहन देत वेरुळला पाठवले.

हेही वाचा...

चिलेखनवाडीतील ऑक्‍सिजन प्रकल्पाला "उर्जा' 

नेवासे : तालुक्‍यातील चिलेखनवाडी येथील ऑक्‍सिजन प्रकल्पाचा वीज पुरवठा अखंडित ठेवा. स्वतंत्र वीज कर्मचाऱ्याची नेमणूक करा, तसेच ऑक्‍सिजन भरण्यासाठी लागणारे रिकामे गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्या, अशा सूचना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 
गडाख यांनी आज चिलेखनवाडी येथील मे. सुलोचनाबाई इंडस्ट्रीज प्रा. ली. या ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्पाची पाहाणी करून उत्पादन, मागणी, पुरवठा व उत्पादनात येणाऱ्या अडचणी यांची माहिती घेतली. 
या वेळी प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक बजरंग पुरी यांनी प्रकल्पाची माहिती दिली. मंत्री गडाख यांनी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, गणेश पवार व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना समक्ष सूचना देऊन रिकामे सिलिंडरची व्यवस्था करणे तसेच चोवीस तास वीज पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्याशी चर्चा केली व चोवीस तास अखंडित वीज पुरवठा कसा राहील, याकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. 
या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, डॉ. रामेश्वर शिंदे, आशिष पुरी, मंगेश पुरी, सरपंच भाऊसाहेब सावंत उपस्थित होते. 

दरम्यान, याची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com