भाजप आमदार भोळेंनी पर्रीकरांचा फोटो ट्विट करून साधला ठाकरेंवर निषाणा - BJP MLA Bhole tweeted a photo of Parrikar and targeted Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदार भोळेंनी पर्रीकरांचा फोटो ट्विट करून साधला ठाकरेंवर निषाणा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

जळगाव जिल्ह्यात कोरोना वाढत आहे. अशा स्थितीत आमदार भोळे यांच्यावर विरोधी पक्षकडून टीका करण्यात येत आहे. तर आमदार सुरेश भोळे हे ट्विटरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत.

जळगाव : कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असतानाही राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या  राजकीयफैरी झडत आहेत. जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे यांनी गोव्याचे माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा फोटो ट्विट करून मुखमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना वाढत आहे. अशा स्थितीत आमदार भोळे यांच्यावर विरोधी पक्षकडून टीका करण्यात येत आहे. तर आमदार सुरेश भोळे हे ट्विटरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. आज त्यांनी गोव्याचे माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा तोंडाला गॅस मास्क लावून काम करीत असतानाचा फोटो ट्विट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ``डोळे भरून येणारच, प्रकृती नाजूक असतानाही काम करायचं असतं, प्रजेसाठी मुख्यमंत्री असतो, हे समजून घ्यायाच असतं. घरी बसून प्रकृती सांभाळणारा मुख्यमंत्री जनतेला नको असतो. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारा समाजसेवी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर.``

 

हेही वाचा..

नगराध्यक्षा आदिक यांच्यातर्फे मदत जाहीर

श्रीरामपूर : येथील नगरपालिकेच्यावतीने उभारल्या जाणाऱ्या कोविड सेंटरसाठी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

नागरिकांच्या सोईसाठी पालिकेच्यावतीने शहरात शासकीय कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी सर्वस्तरातून होत होती. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने कोविड सेंटर उभारणीचे नियोजन केले आहे. त्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत नगराध्यक्षा आदिक यांनी एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी आदिक कुटूंबाच्या वतीने 20 हजार कुटुंबांना किराणा वाटप केला होता. तसेच दिव्यांगांनाही मदतीच्या किटचे वाटप केल्या होत्या. ग्रामीण रुग्णालय, संतलुक रुग्णालय, युनिटी हाॅस्पीटल येथे वाफेचे मशिन भेट दिले होते.

आशा सेविकांना पीपई किट, मास्क वाटप केले होते. महाराष्ट्र कृषक समाजाच्या वतिने रक्तदान शिबीर आयोजित करुन जनजागृती केली होती. मदतकार्याचा वारसा कायम ठेवत कोविड सेंटरसाठी एक लाखाची मदत जाहीर केली. समाजातील दानशूरांनी पुढाकार घेवून कोविड सेंटरसाठी मदतीचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख