भाई जगताप माझ्या विरोधकांना ताकद देतात 

जगताप यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत, आपल्याला डावलले जात असल्याचे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
 Zeeshan Siddiqui, Bhai Jagtap  .jpg
Zeeshan Siddiqui, Bhai Jagtap .jpg

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्याविरोधात काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. (Zeeshan Siddiqui complaint against Bhai Jagtap to Rahul Gandhi)

जगताप यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत, आपल्याला डावलले जात असल्याचे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे. काँग्रेस आमदार सिद्दीकी यांनी पत्र लिहून भाई जगताप यांच्याविरोधात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे.  

झिशान सिद्दीकी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माझ्याच पक्षाचे अध्यक्ष माझ्या विरोधात कारवाया करत आहेत. माझ्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने कार्यक्रम घेतला, स्थानिक आमदार असूनही मला बोलावले नाही. मुंबई युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सिद्दीकी यांच्या उमेदवाराला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही, असे भाई जगताप यांनी सांगितले असल्याचे म्हटले आहे. 
 
बीकेसी पोलीस स्टेशनला मुंबई काँग्रेसने पोलिसांना कोरोनासाठी आवश्यक साधन सामुग्री वाटप केले, त्या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, मला बोलवण्यात आले नाही, प्रोटोकॉल पाळले जात नाही, असेही सिद्दीकी यांनी म्हटले आहे. पक्षात माझ्या विरुद्ध काम करणाऱ्यांना ताकद दिली जाते. असा आरोप सिद्दीकी यांनी केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना लिहिलेले पत्र सिद्दीकी यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, के. सी. वेणूगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व भाई जगताप यांनाही पाठवले आहे.

भाई जगताप काय म्हणाले...

तुम्हाला प्रत्येक गोष्टीत गटबाजी का दिसते. काँग्रेसमध्ये प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. सोनिया गांधी असो किंवा राहुल गांधी असो त्यांच्याकडे मत मांडण्याचा अधिकार आहे. मुंबईत पक्षाचे चार आमदार आहेत, त्यापैकी तो सर्वात तरुण आमदार आहे. त्याचा उत्साह मी समजू शकतो, त्याचे जेवढे वय आहे, त्यापेक्षा जास्त कालावधीत मी राजकारणात आहे आणि फक्त आणि फक्त काँग्रेसमध्ये. त्यामुळे माझी कारकीर्द, कामकाजाची पद्धत नेत्यांना माहिती आहे.

मी अध्यक्ष म्हणून जाणीवपूर्वक वेगळी वागणूक कोणाला देत नाही. प्रोटोकॉल असेल तर तो झिशान सिद्दीकीलाही लागतो आणि मलाही लागतो. मी झिशान सिद्दीकीशी चर्चा करुन, नाराजीबद्दल मार्ग काढेन, असेही जगताप म्हणाले. अनेक वेळा झिशान सिद्दीकीनेही प्रोटोकॅाल पाळला नाही. झिशान सिद्दीकीने जरी कार्यक्रम घेतला तरी मी त्या कार्यक्रमाला जाईल. आमच्याकडे गटबाजी नाही, मतभेद असू शकतात. प्रत्येकाला मत माडण्याची आमच्याकडे मुभा असल्याचे जगताप यांनी सांगितले.    

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com