मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे जणू काही वर्गच मंत्रालयात सुरू करण्यात आले आहेत. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा गणवेश नियम, उपस्थिती नियम आणि आता मंत्रालयाच्या लॉबीत उभा राहून चहा पिता येणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या लॅाबीत सरकारी अधिकारी व कर्मचारी तसेच अभ्यागत हे कोणत्याही वेळी चहा पितांना आढळतात. त्यावर आता सरकारने बंदी घातली.
राज्य सरकारचा कारभार मंत्रालयातून चालविण्यात येतो. सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनीधी,अधिकारी हे त्यांच्या कामासाठी कार्यालयाला भेट देतात. अशा वेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हे कोणत्याही वेळी चहा पितांना आढळतात. ही गोष्ट कार्यालयीन शिस्तीशी सुसंगत नाही. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होते, असे कारण सरकारने दिले आहे.
त्यामुळे लॉबीत उभ राहून चहा पिण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्या ऐवजी मंत्रालयाच्या सहाव्या आणि तिसऱ्या मजल्यावर ट्रे सर्विसद्वारे सकाळी साडेनऊ ते साडेअकरा आणि दुपारी तीन ते सहा या वेळेत चहा पुरवला जाणार असल्याचा आदेश काढण्यात आला आहे.
फक्त याच वेळेत चहा मिळणार
सकाळी ९.३० ते १०.३०, दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेतच चहा मिळणार आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
बाळासाहेबांचे नांव देण्यास स्थानिक मनसे, भाजपचाही विरोध#राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/UOW2IM6wJ4
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 6, 2021
हेही वाचा: गाडी भलत्याची - मनःस्ताप मात्र रतन टाटांना!
मुंबई : आयुष्यात 'शॉर्टकट'साठी अनेक जण ज्योतिष, अंकशास्त्राचा मार्ग निवडतात आणि आचरणही करतात; मात्र हाच मार्ग कधी अंगलट येईल, हे सांगता येत नाही. अशीच घटना माटुंगा परिसरात घडली. अंकशास्त्राच्या नादात एका वाहनचालकाने आपल्या वाहन क्रमांकातील एक आकडा खोडला अन् तो क्रमांक उद्योगपती रतन टाटा यांच्या गाडीचा निघाला. या सर्व प्रकाराची संबंधित चालकालाही सुतराम कल्पना नसल्याने तोही निवांतपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत राहिला. या सर्व प्रकारात ई-चलान मात्र चक्क उद्योगपती रतन टाटा यांच्या नावे निघू लागले. अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला अन् संबंधित वाहनचालकाला वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले.

