कोरोना संकटामुळे महाराष्ट्रातही यंदाची दिवाळी फटाकेमुक्त ?  - This year's Diwali firecracker-free in Maharashtra due to corona crisis? | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना संकटामुळे महाराष्ट्रातही यंदाची दिवाळी फटाकेमुक्त ? 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा टोपे यांचा प्रयत्न आहे.

मुंबई : राजस्थान, ओडीसा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्‍यांवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्याची शक्‍यता असल्याचे वृत्त आहे. 

कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा टोपे यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने ते मंत्रीमंडळ बैठकीत तशी मागणी करणार असल्याचे समजते. दिवाळीत फटाक्‍यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. त्यामुळे श्वसनाला त्रास होतो. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे 

आज टास्क फोर्स बरोबर झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. दिवाळीनंतर थंडीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता असून राज्य सरकारने या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज यासंदर्भात टास्क फोर्स आणि डेथ ऑडीट कमिटीची बैठक घेतली. 

हे ही वाचा : 
अर्णब गोस्वामींना मारहाणप्रकरणी राम कदमांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना मारहाण करणाऱ्या नऊ पोलिसांना तातडीने निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. 

नाईक मृत्यूप्रकरणी गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. काल त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेताना झटापटी केली होती आणि मारहाण केली होती असा आरोप गोस्वामी यांनी केला आहे. गोस्वामींवर झालेल्या कारवाईने भाजपचे संतापले आहेत. गोस्वामीला अटक केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते चंद्रकांतदादांपर्यंत सर्वच भाजप नेत्यांनी या अटकेचा निषेध केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख