शिवतारेंनी रुग्णालयातूनच केली आमदार जगताप यांची तक्रार

आमदार संजय जगताप यांनी गुंजवणीचे काम बंद सूचना दिल्या आहेत.
Sarkarnama Banner - 2021-06-28T154204.412.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-28T154204.412.jpg

मुंबई : आमदार संजय जगताप यांनी गुंजवणू योजनेच्या जलवाहिनीचे काम अधिकाऱ्यांना धमकावून बंद पाडले असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. याबाबत शिवतारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. शिवतारे हे सध्या मुंबई येथील रूग्णालयात उपचार घेत आहेत. Former Minister Shivtare wrote a letter to the Chief Minister from the hospital

गुंजवणी धरणाला  १९९३ मध्ये मंजूरी मिळाली. त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे राज्यमंत्री असताना या धरणाचे काम पूर्ण झाले. गुंजवणीतून बंद जलवाहिनीतून भोर, वेल्हे, पुरंदर तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी योजना आखण्यात आली. त्यासाठी सुमारे १३१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्या माध्यमातून योजनेचे काम वेल्हे, भोर तालुक्यात पूर्ण झाले. पण पुरंदर तालुक्यात काही दिवसापूर्वी या योजनेचे काम सुरू झाले पण कालपासून हे काम बंद करण्यात आले आहे. 

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे..    

स्थानिक आमदार संजय जगताप या कामात सातत्याने अडथळे आणण्याचे काम करत आहेत. जगताप यांनी अधिकाऱ्यांना धमकावून गुंजवनीचे काम बंद सूचना दिल्या आहेत. तसेच कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावं असाही आग्रह असल्याचे समजते. राज्यमंत्री पदाच्या काळात मोठ्या मेहनतीने मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले. प्रकल्पाच्या पाईपलाईनच्या कामालाही मागील वर्षी सुरुवात झाली. भोर आणि वेल्हा तालुक्यात काम सुरू आहे. योजना लवकर पूर्ण करण्याच्या हेतूने जलसंपदा विभागाशी समन्वय साधत काही दिवसांपूर्वी मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामाला सुरुवात केली. वास्तविक जलवाहिनी बंदद्वारे 100 टक्के सूक्ष्म सिंचन करणार देशातील पहिला प्रकल्प असून तो संबंध देशाला दिशा देणारा आहे. त्यासाठी मी तब्बल 1313 कोटी रुपयांना मी मंजुरी मिळवली होती. हरित लवाद, जलसंपत्ती अधिनियम प्राधिकरण, उच्च न्यायालय, केंद्रीय पर्यावरण विभाग अशा अनेक ठिकाणी सातत्याने याचिका करून काम होऊ नये म्हणून मला त्रास देण्यात आला आस या पत्रात शिवतारेनी म्हटलं आहे. तसेच तात्कालिक राज्य आणि केंद्र सरकारने बंद जलवाहिनीचा हा प्रकल्प पाहून इतके प्रभावित झाले की त्यांनी संबंध देशात यापुढे कालव्याने पाणी देण्याची पद्धत बंद करून जलवाहिनीचे धोरण स्वीकारले. ज्यांनी प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न केले त्यांच्या हस्ते अशा महत्वकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ व्हावा याच्या इतकी शोकांतिका असूच शकत नाही. सदर कामाचा शुभारंभ आपल्या व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व्हावा, अशी माझी इच्छा आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com