स्वतःला शिक्षा करून घेण्याऐवजी नराधमांना जन्माची अद्दल घडवा

कामाच्या ठिकाणी किंवा घरात वा अन्यत्र कोठेही लैंगिक छळ होत असल्यास महिलांनी तो मुकाटपणे सहन करू नये.मुंबई : कामाच्या ठिकाणी किंवा घरात वा अन्यत्र कोठेही लैंगिक छळ होत असल्यास महिलांनी तो मुकाटपणे सहन करू नये. त्यासमोर पराजित तर अजिबात होऊ नये. त्या अन्यायाचा सर्व शक्तीनिशी प्रतिकार करावा, भाजप महिला मोर्चा तुमच्या पाठिशी उभा राहील, असे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या मुंबई प्रमुख व नगरसेविका शीतल देसाई यांनी केले आहे.
Sheetal Desai .jpg
Sheetal Desai .jpg

मुंबई : कामाच्या ठिकाणी किंवा घरात वा अन्यत्र कोठेही लैंगिक छळ होत असल्यास महिलांनी तो मुकाटपणे सहन करू नये. त्यासमोर पराजित तर अजिबात होऊ नये. त्या अन्यायाचा सर्व शक्तीनिशी प्रतिकार करावा, भाजप महिला मोर्चा तुमच्या पाठिशी उभा राहील, असे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या मुंबई प्रमुख व नगरसेविका शीतल देसाई यांनी केले आहे.

देसाई म्हणाल्या, ''महाभकास तिघाडी सरकारच्या राज्यात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. या सरकारमधील एक पक्ष शिवसेना आहे व महिलांनी अन्याय-अत्याचार सहन करू नये, अशी शिकवण त्या पक्षाचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती. जनतेवर होणारे अन्याय 'मार्मिक' मधून मांडतांना, 'वाचा आणि स्वस्थ बसा', असे ते उपरोधिक शैलीत लिहीत असत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, असेच ते सूचित करत. त्यानुसार महिलांनी अशा अत्याचारांबाबत स्वतःलाच शिक्षा करून घेण्याऐवजी त्या नराधमांना कायद्यानुसार जन्माची अद्दल घडवावी, असे देसाई यांनी सांगितले. 

मोठे लोकच महिलांची फसवणूक आणि अत्याचार करू लागल्याने त्याखालच्या पातळीवरील वासनांध व्यक्तींना, अशी दुष्कृत्ये करण्यास जोर चढू लागला आहे. भाजप अशा अन्यायांविरुद्ध सर्व पातळ्यांवर दाद मागेलच. मात्र, अन्याय करणाऱ्यांप्रमाणेच अन्याय सहन करणाराही तितकाच दोषी असतो, हे महिलांनीदेखील ध्यानात ठेवावे. आता कायदे महिलांच्या बाजूने असल्याने महिलांनी त्यांचा वापर करून गुन्हेगारांना अद्दल घडवावी''. महिलांवर अन्याय-अत्याचार झाल्यास वा तसा प्रयत्न होत, असल्यास आत्महत्या करणे हा उपाय नाही.

तसे केल्याने स्वतःबरोबरच आपले सासर व माहेर अशी दोनही कुटुंबे उद्‌ध्वस्त होतात. त्यामुळे आपलीच कुटुंबे उद्‌ध्वस्त करण्याऐवजी, आपली गडचिरोलीला बदली झाली तरी बेहत्तर पण गुन्हेगाराला कायद्याने शासन करण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करावे, अन्यायाविरोधात पोलिस-न्यायालये येथे दाद मागावी, भाजपचे लोकप्रतिनिधी, एनजीओ, प्रसारमाध्यमे आदींशी संपर्क साधावा, असा सल्ला देसाई यांनी दिला आहे.
 

 Edited By - Amol Jaybhaye    
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com