मुंबईत महिला सुरक्षित, मुंबईचा मला अभिमान ! उर्मिला मातोंडकरांचा कंगनाला टोला का ? 

मी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताना कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती. तसेच शिवसेनेत प्रवेश करतानाही कोणतीही अपेक्षा ठेवली नाही.
मुंबईत महिला सुरक्षित, मुंबईचा मला अभिमान ! उर्मिला मातोंडकरांचा कंगनाला टोला का ? 

मुंबई : "" मी साध्या मराठी कुटुंबातून आलेली मराठी मुलगी आहे. लोकांची साथ मिळाली म्हणून इथपर्यंत पोचले. मी पीपल मेड स्टार आहे. आता मला पीपल मेड लिडर व्हायला आवडेल असे स्पष्ट करतानाच मुंबईचा मला अभिमान आहे हे सांगण्यासही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर विसरल्या नाहीत. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्‍मी ठाकरे आदींच्या उपस्थितीत मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यापूर्वी त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून थेट लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसला रामराम केला होता. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि राज्यात शिवसेनेची सत्ता आली. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राज्यात राजकीय धुरळा उडाला. अभिनेत्री कंगना राणावत यांनी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मातोंडकर यांनी तिला मुंबई आणि मराठी मुद्यावर सुनावले होते. आज शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अप्रत्यक्ष कंगनाला टोला लगावताना म्हटले की मुंबईचा मला अभिमान आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने वाखाणण्यासारखं काम केलं आहे. कोविड, दुष्काळ, वादळ सारखी संकट आली. या संकटातही सरकारने चांगले काम केले असेही त्या म्हणाल्या. 

माझं नाव आमदार म्हणून सांगण्यात आलं आहे. तुम्हीच आता त्यांना सांगा ते द्यायला असे सांगतानाच मातोंडकर म्हणाल्या, की कंगणाबाबत बोलायची गराज नाही. भाजपने माझ्यावर खूप टीका केली. ट्रोल हे हीन पातळीवरचे करण्यात आले. मी मराठी मुलगी आहे. पाऊल पुढे टाकलं तर मागे घेणार नाही. 

मी महाराष्ट्रासाठी काम करणार आहे. मी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताना कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती. तसेच शिवसेनेत प्रवेश करतानाही कोणतीही अपेक्षा ठेवली नाही.शिवसेनेची महिला आघाडी मजबूत आहे. तसेच मुंबईत महिला सुरक्षित आहे. मुंबईचा मला अभिमान आहे असे मातोंडकर यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com