ठाकरे सरकार पैशांसाठी डान्सबारही सुरू करणार का? (व्हिडिओ)

आयपीएल सुरु होत असलेल्या दिवशीच याची माहिती लोकांना होणे म्हणजे सध्या सुरु असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंगला अभय देण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे का?
Will Thackeray government start dance bar for money? : Atul Bhatkhalkar
Will Thackeray government start dance bar for money? : Atul Bhatkhalkar

मुंबई : "राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणारे ठाकरे सरकार उद्या पैशांसाठी डान्सबारही पुन्हा सुरू करतील, लॉटरी लागून सत्तेवर आलेल्या या सरकारकडून जुगार अधिकृत होण्याचीच अपेक्षा आहे,' असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

ऑनलाईन जुगाराला संमती देऊन गरिबांची घरे उद्‌ध्वस्त करण्याचा ठाकरे सरकारचा डाव आहे. पैशांसाठी ठाकरे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का? आयपीएल सुरु होत असलेल्या दिवशीच याची माहिती लोकांना होणे म्हणजे सध्या सुरु असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंगला अभय देण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे का? असे प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत. 

भाजप आमदार भातखळकर म्हणाले की, राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणे कितीपत योग्य आहे, हे तपासण्याकरिता वित्त विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेखाली सरकारने समिती नेमली होती. त्या अहवालानुसार राज्यात लवकरच जुगाराला अधिकृत करणार असल्याचे संकेत सरकारने दिले आहेत. राज्याला यातून करापोटी रक्कम मिळेल; परंतु त्यामुळे राज्यातील लाखो कुटुंब उद्‌ध्वस्त होणार आहेत, याचा विसर सरकारने पडू देऊ नये. 

राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची असून राज्याचा करेत्तर महसूल वाढविण्यासाठी इतर चांगले मार्ग शोधता येतील. ते सोडून सरकार गरिबांना उद्‌ध्वस्त करण्याचा मार्ग स्वीकारत आहे. यातून ठाकरे सरकारच्या नीतिमत्तेची पातळी दिसून येते. लॉटरी लागून सत्तेत आलेले हे सरकार जुगाराला पाठींबा देणारच ना, असा टोला सुद्धा आमदार भातखळकर यांनी लगावला आहे. 

कोणाच्या तरी हट्टापायी नाईट लाईफ सुरू करून मुंबईतील तरुणांना नशेच्या आहारी लावण्याचे पाप या सरकारने पूर्वीच केले आहे. राज्यात अंमली पदार्थ तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, त्यावर नियंत्रण मिळवणे सोडून आता पैशासाठी जुगार अड्डे सुरु करण्याचा हे सरकार प्रयत्न करीत आहे. यापुढे पैशासाठी ठाकरे सरकार डान्सबार सुद्धा सुरु करेल, असा आरोपही अतुल भातखळकर यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com