मुंबई : शेअर बाजारातून कर्जरोखे विकून पैसे उभे करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार सुरु आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी तीन ते चार हजार कोटी निधीची गरज भागवण्यासाठी हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी कर्ज रोखेच विकताय ना? 7/12 वर मालक मुंबईकरच राहणार ना? असा सवाल शेलार यांनी सत्ताधार्यांना विचारला आहे.
शेलार आपल्या टि्विटमध्ये म्हणाले की, एकिकडे हेरिटेज वॉक सुरु करुन ऐतिहासिक मुंबई महापालिकेची वास्तू खुली केलीत.. दुसरीकडे कर्ज रोखे काढून महापालिकेला "बाजारात" उभी केलीत. वा! अखेर श्रीमंत महापालिकेची शोभा व्हायची ती झालीच.. अशी टीका शेलार यांनी केली. नीट काळजी घेताय ना? कर्ज रोखेच विकताय ना? 7/12 वर मालक मुंबईकरच राहणार ना? असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.
एकिकडे हेरिटेज वॉक सुरु करुन ऐतिहासिक मुंबई महापालिकेची वास्तू खुली केलीत...
दुसरीकडे कर्ज रोखे काढून महापालिकेला "बाजारात" उभी केलीत.
वा! अखेर श्रीमंत महापालिकेची शोभा व्हायची ती झालीच..नीट काळजी घेताय ना?
कर्ज रोखेच विकताय ना?
7/12 वर मालक मुंबईकरच राहणार ना?— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 31, 2021
काय आहे प्रकरण?
कोरोना महामारीमुळे महानगरपालिकेचे आर्थिक गणीत बिघडू लागले आहे. २०२० -२१ मध्ये कोट्यावधी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी, विकासकांना प्रीमिअमध्ये ५० टक्के सवलत आणि कोरोना काळातील खर्चामुळे माहापिलिकेचे हजारो कोटीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता अशा मोठ्या प्रकल्पांचे काम सुरु ठेवण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे.
गटनेत्यांच्या बैठकीत होणार निर्णय
शेअर बाजारातून कर्जरोखे उभारण्याबाबत गेल्या आठवड्यात महापालिका मुख्याल्यात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. सर्वपक्षीय गटनेत्यांचा बैठकीत याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून मांडला जाणार आहे.
Edited By - Amol Jaybhaye

