किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढणार? १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल   - Will Kirit Somaiya's problems increase? Filed a defamation suit of Rs 100 crore | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढणार? १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल  

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

सोमय्या यांनी या दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास सिव्हील व क्रिमिनल कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वायकर यांना नोटीसीद्वारे दिला होता.

मुंबई : अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने बिनबुडाचे आरोप करुन आपली, आपल्या कुटुंबाची व पक्षाची नाहक बदनामी केल्या बद्दल व जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास, दिल्यामुळे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

हे ही वाचा : मोदींच्या छळामुळे स्वराज आणि जेटलींचा मृत्यू झाल्याच्या आरोपाला मुलींनी दिले 'हे' उत्तर

अलिबाग कोर्लई येथील संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संयुक्तरित्या खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. यावेळी या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. परंतु त्यांचे या सर्व निराधार आरोपात काहीच तथ्य नसल्याचे विविध प्रसामाध्यमांनीच पुढे उघडकीस आणल्याने सोमय्या या प्रकरणी तोंडघशी पडले, असे वायकर म्हणाले.

त्यानंतर महाकाली गुंफा येथील जमिनप्रकरणी वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवांकडून २५ कोटी रुपयांचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केला होता. हे आरोप करतांना त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नाहीत. किरीट सोमय्या हे सातत्याने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी लोकप्रतिनिधीची आपली जनमानसातील प्रतिमा, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास देत असल्याचे वायकर म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : राज्यात सर्वाधिक ४३ हजार १८३ रुग्ण : दिवसभरात २४९ रुग्णांचा मृत्यू
 

सोमय्या यांनी या दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास सिव्हील व क्रिमिनल कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वायकर यांना नोटीसीद्वारे दिला होता. या दोन्ही प्रकरणी वायकर यांनी मुंबई पोलिस आयुक्त तसेच एम. आय. डी. सी पोलिस ठाण्यास पत्र देऊन बेताल व बिनबुडाचे वक्तव्य करुन जनमानसातिल लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करणार्‍या सोमय्या यांना लगाम घालण्याची उचित ती कारवाई करण्याची विनंतीही केली होती.अखेर आमदार रविंद्र वायकर यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. एवढेच नव्हे तर लवकरच या प्रकरणात क्रिमीनल दावाही दाखल करणार असल्याचे वायकर यांनी सांगितले आहे.
 

Edited By - Amol Jaybhaye 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख