2Sarkarnama_20Banner_20_202021_05_05T093157.449.jpg
2Sarkarnama_20Banner_20_202021_05_05T093157.449.jpg

मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्याचिका दाखल करणार : एकनाथ शिंदे

मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत राज्य सरकार शांत बसणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

बार्शी (सोलापूर) : "मराठा आरक्षणाच्या  Maratha reservation case प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका Maratha reservation judgement दाखल करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू," असे  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  यांनी आज सांगितले. Will discuss with CM regarding application regarding Maratha reservation Supreme Court Eknath Shinde

सोलापुरात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होता या दौऱ्यामध्ये त्यांनी बार्शी येथील भगवंत इन्स्टिट्यूटमधील 1000 खाटांच्या कोविड सेंटरचे उद्घाटन केलं. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये शिंदे बोलत होते.  राज्यात ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल, तेथे शिवसेनेच्या माध्यमातून कोविड सेंटरची सुविधा निर्माण करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.  

जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत राज्य सरकार शांत बसणार नाही असेही मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाचे आरक्षण जरी रद्द झाले असले तरी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा देऊ तसेच आवश्यक की मदत वेळ पडेल त्यावेळी करु असेही शिंदे म्हणाले. मराठा आरक्षणाबाबतचा न्यायालयाचा निर्णय दुदैवी आहे.  हा काही अंतिम निर्णय नाही, याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत पुढील दिशा लवकरच ठेवण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केले आहे. या निर्णयामुळे अन्यायग्रस्त मराठा समाजावर पुन्हा अन्यायच झाला आहे. आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन मूक मोर्चे काढून मराठा समाजाने अभूतपूर्व लढा उभा केला होता. मात्र आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार कमी पडले, असे विरोधकांचे मत आहे.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com