बदली झाल्यानंतरच परमबीरसिंहांना कंठ का फुटला?

अनिल देशमुख यांनी विचारला प्रश्न
anil-deshmukh-jayant-patil-
anil-deshmukh-jayant-patil-

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला असून ते खोटे बोलत असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. 

हे प्रश्न पुढीलप्रमाणे : 

- सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ? 

- आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर श्री. परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्च ला एसीपी श्री. पाटील यांना व्हॉटसअप चॅटवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून श्री. परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना श्री. परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय? 

- 18 मार्च रोजी मी एका कार्यक्रमामध्ये परमबीरसिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.

- - पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परम बीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. 

- परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.  स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.

- सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते? विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. 

-स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे मा. मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी.

...........

या प्रकरणावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया:

जयंत पाटील : सध्याचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. मुंबई क्राइम ब्रॅंच असेल किंवा ठाणे पोलिस आणि सीआयडी पथक योग्य पद्धतीने तपास करत आहेत. हा सगळा प्रकार आहे लक्ष विचलीत करण्याचा असावा, असे परमबीरसिंगांच्या पत्रावरून  जाणवत आहे. या परिस्थितीमध्ये सुद्धा सरकार खंबीर आहे. कोणतीही अडचण येणार नाही योग्य तो तपास केला जाईल.

संजय राऊत : परमबीरसिंग संदर्भात मला काही माहिती नाही. सरकार त्याच्यावर बोलेल.

प्रकाश आंबेडकर : राज्याच्या राजकारणातील गुन्हेगारी घटक आणि प्रशासनातील गुन्हेगार मिळून हे सरकार बनले आहे. वसुलीची रक्कम 100 कोटी पेक्षाही अधिक असू शकते. त्यामुळे हे सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी करत मी येत्या 22 तारखेला राज्यपाल याना भेटणार आहे.

राज ठाकरे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com