एकाही मंत्र्याने शासकीय इस्पितळात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही ?-भातखळकर - Why no one minister has dared to be admitted in a government hospital? - Bhatkhalkar | Politics Marathi News - Sarkarnama

एकाही मंत्र्याने शासकीय इस्पितळात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही ?-भातखळकर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत सताधारी पक्षाने आपल पाठ थोपटून घेतली आहे

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना शासकीय इस्पितळात दाखल केले. पण आता त्यावरून चांगलेच राजकारण तापू लागले आहे. सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत सताधारी पक्षाने आपल पाठ थोपटून घेतली आहे. 

मग कोरोनाची लागण झालेल्या १६ पैकी एकाही मंत्र्याने शासकीय इस्पितळात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही  ? असा सवाल  भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना झाल्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून त्याच्यांवर उपचार सुरु आहेत. फडणवीस यांनी पूर्वीच गिरीश महाजन यांना फोन करून सागिंतले होते, मला जर कोरोना झाला तर शासकीय इस्पितळात भरती करा अशी सूचना देण्यात आली होती.

सरकारी रुग्णालयांची अवस्था पाहून ते खुप अस्वस्थ झाले होते. तरीही त्यांनी सांगितल्याप्रमाणे  त्यांना शासकीय इस्पितळामध्ये भरती करण्यात आले आहे.मागच्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रवास करत होते. त्यांनी जवळपास ९०० किलोमीटर प्रवास केला आहे .आता शासकीय इस्पितळे कशी चांगली आहेत हे सरकार सागंतय अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख