भाजप खासदाराने जवानावर तलवारीने हल्ला केला तेव्हा रस्त्यावर का नाही उतरला ? शिवसेनेचा सवाल 

ज्या राज्यात कमवायचे, राहायचे त्याच राज्यात मोठ्या नेत्याबाबत वेडेवाकडे बोलायचे आणि संतापलेल्या कोणी मुस्कट फोडले की अत्याचार, अन्यात, स्वातंत्र्यावर घाला अशी विशेषण वापरायची.?
भाजप खासदाराने जवानावर तलवारीने हल्ला केला तेव्हा रस्त्यावर का नाही उतरला ? शिवसेनेचा सवाल 

मुंबई : नौदलाच्या माजी अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांच आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर फिरवून काय मिळवलं ? घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा मान राखा, असे नौदल सेवेत कोणी शिकवले नव्हते काय ? असा सवाल शिवसेनेने केला आहे. 

ज्या राज्यात कमवायचे, राहायचे त्याच राज्यात मोठ्या नेत्याबाबत वेडेवाकडे बोलायचे आणि संतापलेल्या कोणी मुस्कट फोडले की अत्याचार, अन्यात, स्वातंत्र्यावर घाला अशी विशेषण वापरायची. आपण खाल्या ताटात छेद केलात. असे दळभद्री प्रकार राज्यात चालवले जातात. तो देश जागतिक स्तरावर काय प्रगती घेणार? असे शिवसेनेचे मुख्यमत्र असलेल्या सामनात म्हटले आहे. 

आपल्या सैनिकी पेशाला जागून त्यांनी 20 जवानांच्या हत्येस जबाबदार राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण ंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी होती. माध्यप्रदेशमध्ये भाजप नेत्याच्या गोळीबारात एक जवान गंभीर जखमी, एका भाजप खासदारांने सीमा सुरक्षा दलाचे जवान सोनू महाजन यांच्यावर तलवारीने हल्ला केला 
त्यावेळी भाजपचे लोक का रस्त्यावर उतरले नाहीत? असा संतप्त सवालही शिवसेनेने केला आहे. 

गोमांस प्रकरणात हत्या झालेले अखलाख यांचा मुलगा ही देशाच्या लष्करात आहे. निवृत्त सैन्य अधिकारी अमनुल्ला यांच्या घरात घुसून जमावाने हल्ला केला त्यात ते व त्यांची पत्नी ठार झाले. भाजपच्या योगी यांच्या राज्यात ही घटना घडली. मागील 24 तासात कर्नाटकात तीन पुजारांना मारले. उत्तर प्रदेशात मंदिरात जाणाऱ्या पुजाऱ्याची भोसकून हत्या करण्यात आली. पालघर प्रकरणाचे राजकीय भांडवल करणारे या प्रकरणात गप्प का? याचे उत्तरही शिवसेनेने भाजपने द्यावे अशी मागणी केली आहे. 

एका नातीला वाय प्लस अशी सुरक्षा केंद्राने आणि हिमाचालप्रदेश सरकारने दिली त्याच कौतुक आहे. मग हिमाचालप्रदेशमध्ये एका विवाहितेवर चार 7 जणांनी बलात्कार केला तिला जीवे मारण्याची धमकी दिली यात त्या महिलेला झेड सुरक्षा ही द्यायलाच हवी, तसे मात्र का झाले नाही ? आदी प्रश्‍नांचा भडिमार शिवसेनेवर भाजपवर केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com