अंबानींच्या घराजवळ स्फोटके असलेल्या गाडीजवळ सर्वप्रथम कोण पोहोचले? - who reached first at car laden by explosive near home of Ambani | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

अंबानींच्या घराजवळ स्फोटके असलेल्या गाडीजवळ सर्वप्रथम कोण पोहोचले?

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 6 मार्च 2021

पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचे स्पष्टीकरण 

मुंबई : हिरेन मनसुख यांच्या मृत्यूप्रकरणी विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर आपण अंबानी यांच्या घराजवळ असलेल्या कारपर्यंत सर्वप्रथम मी पोहोचलो नसल्याचे सचिन वाझे यांनी सांगितले.

सर्वप्रथम गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर वाहतूक शाखेचे अधिकारी तेथे गेले. त्यानंतर स्थानिक उपायुक्त, बीबीडीएस व त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक पोहोचले होते. त्यात मी असल्याचे वाझे यांनी सांगितले.

दरम्यान, आपली मानसिक स्थिती ठीक नसून पत्रकार व पोलिस आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार मनसुख हिरेन यांनी मुंबई पोलिस आयुक्त व ठाणे पोलिस आयुक्तांकडे केल्याचे आपल्याला समपल्याचे वाझे यांनी यावेळी सांगितले. एका पत्रकाराने मनसुख यांना रात्री उशिरा दूरध्वनी करून पोलिस तुमच्याकडे संशयित म्हणून पाहत असल्याबाबत विचारणा केली होती, अशीही माहिती आम्हाला मिळाली आहे. दूरध्वनी संभाषणाबाबत (सीडीआर) विचारले असता, वाझे यांनी त्याबद्दल आपल्याला माहिती नसून फडणवीस यांना विचारावे लागेल, असे सांगितले. तसेच मनसुख यांच्या तुम्ही संपर्कात होते का, याबाबत वाझे यांनी त्यांचे ठाण्यात दुकान आहे. माझ्याबाबतच्या आरोपांबद्दल मला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

ही पण बातमी वाचा : आत्महत्येपूर्वी मनसुख यांना फोन करणारा तावडे कोण?

कोण आहेत सचिन वाझे?
1990 मध्ये सेवेत दाखल झालेल्या वाझे यांनी 63 गुंडांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात उपनिरीक्षक पदापासून झाली. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त परिसरातून सेवेची सुरूवात करणाऱ्या वाझे ठाणे पोलिस दलातील कामकाजामुळे प्रसिद्धीला आले. 2002 साली घाटकोपर स्फोटीतील संशयीत आरोपी ख्वाजा युनूस याच्या कोठडीतील संशयीत मृत्यूप्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षातही प्रवेश केला होता. ख्वाजा युनूसप्रकरणी वाझे यांच्यासह 18 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पुढे न्यायालयीन प्रक्रियाही चालली. वाझे यांच्यासर इतर विविध प्रकरणांमध्ये निलंबीत 18 पोलिसांना सेवेत सामावून घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना घरातून उचलले होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख