कोण आहेत अर्णब गोस्वामी, घटनेपेक्षा मोठे आहेत का ? वडेट्टीवारांचा सवाल  - Who is Arnab Goswami, is he bigger than the incident? Vadettiwar's question | Politics Marathi News - Sarkarnama

  कोण आहेत अर्णब गोस्वामी, घटनेपेक्षा मोठे आहेत का ? वडेट्टीवारांचा सवाल 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

लोकांच्या भावना लक्षात घ्या, तुमचे कपडे उतरविले जात आहेत असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

मुंबई : कोण आहेत अर्णब गोस्वामी. ते घटनेपेक्षा मोठे आहेत का ? नाईक मृत्यूप्रकरणात त्यांच्यावर झालेली कारवाई ही योग्यच आहे असे सांगत दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्याची आमची सर्व तयारी झाली असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली. 

मराठी माणसाच कुटूंब उद्धवस्त होत असेल तर त्यांना सुरक्षा द्यायची का ? लोकांच्या भावना लक्षात घ्या, तुमचे कपडे उतरविले जात आहेत असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे.शेतकऱ्यांचे इतके मोठे नुकसान होऊनही केंद्राचे पाहणी पथक अजूनही राज्यात आलेले नाही. कुठे गेले विरोधक ?

कुठे गेली ही टीम? काय गौडबंगाल आहे की 18 दिवसानंतर ही टीम आली नाही. पाच जागांच्या निवडणूका आल्या आहेत त्यामुळे आचारसंहिता आहे. मी उद्या निवडणूक अधीकारी यांना भेटणार आहोत आणि ही मदत वाटण्याची परवानगी मागणार आहे. 

राज्यपाल नियुक्त 12 जागांना एवढा वेळ लागत आहे आणि या पाच जागा घोषित केल्या आहेत. त्यामुळे शेतकरयांना मदत करायला अडचण येत आहे. तसेच रेल्वे सुरू करण्यसाठी आम्ही तीन पत्र पाठवले आहेत. रेल्वे सुरू नाही म्हणून सर्व सामान्यलोकांचे हाल होत आहेत असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. 

हे ही वाचा: 
वाधवा बंधूंचाजामीन नामंजूर

हजारो कोटींच्या येस बॅंक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कपिल आणि धीरज वाधवा यांचा जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केला. यामुळे वाधवा बंधूंची दिवाळी आता कोठडीत जाणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक असलेल्या कपिल आणि धीरज यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्या. सारंग कोतवाल यांनी बुधवारी (ता. 4) यावर निकाल जाहीर केला. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात वाधवा बंधूंना जामीन मंजूर झाला आहे; मात्र सीबीआयच्या प्रकरणात जामीन नामंजूर करण्यात आला. गॅंगस्टर इक्‍बाल मिर्चीच्या मालमत्ता खरेदी प्रकरणातही वाधवा बंधूंवर ईडीने गुन्हा नोंदविला आहे. 

येस बॅंक प्रकरणात आरोपपत्र दाखल करताना तपास यंत्रणेने नियमांची पूर्तता केली नाही. तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयाने आरोपपत्राची दखल घ्यायला हवी होती. तसेच कागदपत्रे वेळेत दाखल केली नाही, असा दावा ऍड. अमित देसाई यांनी वाधवा यांच्या वतीने केला होता. मात्र कोरोना संसर्गामध्ये सुरक्षा तत्त्वे पाळून कागदपत्रे दाखल केली. असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले होते.

 डीएचएफएलने येस बॅंकेत सुमारे 3700 कोटी रुपयांचे अल्पमुदतीचे रोखे ठेवले होते. यासाठी सुमारे 600 कोटी रुपयांचे कर्ज वाधवान यांच्या निकटवर्तीयांना दिल्याचा आरोप अभियोग पक्षाने केला आहे.
 

 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख