'को-विन'चा गोंधळात गोंधळ...जयंत पाटील म्हणाले, राज्याला स्वतंत्र अॅपसाठी परवानगी द्या!

प्रत्येक राज्याला स्वतंत्र पोर्टल तयार करून द्यावे, किंवा महाराष्ट्र सरकारला स्वतःचे पोर्टल निर्माण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती.
 Jayant Patil .jpg
Jayant Patil .jpg

मुंबई : कोविन- पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे लाखो लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे भारत सरकारने लसीकरण पोर्टलचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी केली आहे. (Water Resources Minister Jayant Patil made this demand to the Central Government)

ते म्हणाले की ''कोविन-पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी येत आहेत. लॉगिन व 'OTP'साठी विलंब अशा अनेक तक्रारी येत आहेत. एका मध्यवर्ती पोर्टलवरुन जवळपास १.३ अब्ज भारतीयांची वेळेवर नोंदणी होणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे. या परिस्थितीत महत्त्वपूर्ण, अशा लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रणाली मर्यादित स्वरूपाची असून त्यातील त्रुटी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत'', असेही जयंत पाटील यांनी नमूद केले आहे.

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रत्येक राज्याला स्वतंत्र पोर्टल तयार करून द्यावे, किंवा महाराष्ट्र सरकारला स्वतःचे पोर्टल निर्माण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. केंद्रसरकारने यावर तात्काळ विचार करावा'' असेही जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात ९ मे पर्यंत 1 कोटी 79 लाख 71 हजार 993 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.  8 मेला 3 हजार 718 लसीकरण केंद्राच्या माध्यमातून 23 लाख 6 हजार 960 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. राज्यात सध्या लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक लसीकण केंद्र बंद आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधत राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली होती. त्यावेळी कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र चांगले प्रयत्न करत असल्याचे म्हणत राज्याचे कौतुक केले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी महाराष्ट्र मुकाबला करताना चांगली लढाई लढत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले होते.

यावेळी केंद्र सरकारने विकसित केलेले कोविन-पोर्टल सुरळीत चालत नसल्याने लसीकरणात अडथळे निर्माण होत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली होते. याच कारणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारचे स्वत:चे पोर्टल विकसित करण्याची परवानगी मागितली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com