राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या गर्दीत विनोद तावडे कुठे दिसेना!

तावडे यांना मुंबईतील राजकारणात स्थान नसल्याची चर्चा...
Rane Janashirawad yatra
Rane Janashirawad yatra

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज निघालेल्या जनआशीर्वाद (Janashirwad Yatra) यात्रेच्या स्वागतासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी मोठी गर्दी केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. मुंबईतील भाजपचे इतर नेतेही या वेळी उपस्थित होते. मुंबईचे नेते असूनही या यात्रेकडे न फिरकलेले पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे (Vinod Tawde) हे मात्र या यात्रेच्या वेळी हजर नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले.

फडणवीस यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर, मंगलप्रसाद लोढा, प्रसाद लाड यांच्यासह मुंबईतील इतर नेते यात्रेत भर पावसात या वेळी ठाण मांडून उभे होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज मुंबईतच होते. ते पण राणेंच्या यात्रेकडे आले नाहीत. महाराष्ट्रात चार केंद्रीय मंत्र्यांच्या विविध भागात यात्रा सुरू आहेत. पाटील हे शिष्टाचार म्हणून कुठेच गेले नसावेत. मात्र आपापल्या भागात निघालेल्या यात्रांत स्थानिक भाजप नेते आवर्जून या यात्रांना उपस्थिती लावत आहेत.

पक्षावर नाराज असल्याची चर्चा असेलल्या दुसऱ्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या स्वतः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या यात्रेच्या प्रारंभाच्या वेळी उपस्थित होत्या. कराड यांनीही बीडमधूनच आपली यात्रा सुरू करत पंकजांना योग्य तो मान दिला. दुसरीकडे मुंबईत मात्र तावडे अनुपस्थित असल्याचे प्रकर्षाने जाणवले. तावडे यांनी फेसबुकद्वारे मात्र आवर्जून राणे यांच्या या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत. `पंतप्रधान नरेंद्र मोदी राणे साहेबांना मंत्री नियुक्त करून , कर्तुत्ववान कोकणातील नेतृत्वाला दिल्ली दरबारी मानाच स्थान दिले आहे. महाराष्ट्र राज्यासोबत, कोकण आणि मुंबईच्या विकासास राणेसाहेब गती देतील,``अशा शब्दांत त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे. त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी बरेच सल्ले दिले आहेत. राणे यांची यात्रा मुंबईत दोन दिवस असणार आहे. नंतर ते कोकणात जाणार आहेत. तावडे नंतरच्या दिवसात सहभागी होणार का, याची उत्सुकता आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. या वेळी तावडे आणि मुंडे उपस्थित होेते. पंकजा यांच्या नाराजीच्या, नाराज नसल्याच्या अशा बातम्या माध्यमांत झळकल्या. मात्र तावडे यांचे या बाजूनेही अद्याप मौनच दिसून येत आहे. सध्या ते सोशल मिडियात थोड्याफार प्रमाणात अॅक्टिव्ह झाल्याचे दिसत आहेत. पण प्रत्यक्ष कार्यक्रमांत न येण्याचे त्यांचे धोरण अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांची उमेदवारी कापल्यानंतर ते बाजूला फेकले गेल्याचे सांगण्यात येते. त्यांना राष्ट्रीय सचिवपदी नेमून आणि हरयानासारख्या राज्याची जबाबदारी देऊन पक्षाने त्यांना संघटनेत स्थान दिले. तरी त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींत तावडेंचे दर्शन अजूनही अभावानेच घडते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com