राणेंना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊ देणार नाही; विनायक राऊतांचा इशारा   

ज्या ज्या ठिकाणी राणे शिवसेनेच्या विरोधात उभे राहतात त्या त्या ठिकाणी शिवसेनेचा विजय होतो.
 Narayan Rane, Vinayak Raut .jpg
Narayan Rane, Vinayak Raut .jpg

सिंधुदुर्ग : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळी राणे हे शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. मात्र, यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Vinayak Raut's warning to Narayan Rane) 

ते सिंधुदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी राऊत म्हणाले, नारायण राणे यांच्या सारख्या विश्वास घातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. नारायण राणे यांच्यासारख्या बाळासाहेबांशी ज्यांनी बेईमानी केली. असा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्या व्यक्तीला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला शिवसैनिक भेटू देणार नाहीत, असा इशारा राऊत यांनी दिला. 

भाजपने नारायण राणे यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी दिली आहे. त्या विषयी विचारले असता राऊत म्हणाले, शिवसेनेला एक चांगले वातावरण झालेले आहे. ज्या ज्या ठिकाणी राणे शिवसेनेच्या विरोधात उभे राहतात त्या त्या ठिकाणी शिवसेनेचा विजय होतो.  शिवसेनीकांमध्ये नारायण राणेचे पानिपत करण्याची ताकद येते. राणे यांना कोणतीही जबाबदारी द्या. शिवसेना आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्या शिवाय राहणार नाही, अशा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, 19 ऑगस्टपासून राणेंची जनआशीर्वाद रॅली सुरू होणार आहे. त्याच दिवशी ते दिल्लीतून मुंबईत दाखल होणार आहेत. विमानतळाहून ही जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी ते जाणार आहेत. नारायण राणे पहिल्यांदाच स्मृती स्थळावर येणार आहेत. त्यामुळे त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, शिवसेनेने राणे यांना स्मृतीस्थळावर येवू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटणार असल्याची चिन्हे आहेत.     

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com