मराठा समाजात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न..मेटेंचा आरोप..आज बैठक - vinayak mete alleges that the government is dividing the maratha community | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा समाजात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न..मेटेंचा आरोप..आज बैठक

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 डिसेंबर 2020

मराठा क्रांती मोर्चाची आज राज्यव्यापी बैठक होत आहे.

मुंबई  : "सरकार मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला एकत्र येऊ देत नाही. जे लोक आज बैठकीला येणार नाहीत. त्यामागे सरकार जबाबदार असेल" असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाची आज राज्यव्यापी बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना मेटे यांनी हा आरोप केला आहे. 
 
या सरकारच्या नाकर्तेपणामुळे व निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षणावर स्थगिती आली. आरक्षणावर स्थगिती आल्यावर मराठा समाजात असंतोषाचा भडका उडाला. परंतु या असंतोषाची दखल घेण्याची तसदी पण राज्य सरकारने घेतली नाही. या अरकरच्या उदासीन भूमिकेवर विचार करणे आणि पुढील दिशा निश्चिती करण्यासाठी मुंबईत या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन मराठा क्रांती मोर्चाच्या केले आहे.

या बैठकीस सकल मराठा समाज मुंबई तर्फे सर्व प्रमुख समन्वयकांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण करण्यात येत आहे. मराठा समाजाचे आंदोलन सद्यस्थितीत दिशाहीन होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे सरकारवर पुन्हा दबाव निर्माण केला नाही तर २५ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या सूनवणीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी व मराठा समाजासाठी असलेल्या सरकारी योजनांचा फायदा समाजाला जास्तीत जास्त कसा मिळू शकेल यावर या बैठकीत विचारविनिमय होणार आहे.

संबंधित लेख