महाविकास आघाडी सरकारने ठेवली विलासराव देशमुखांची आठवण  - Vilasrao Deshmukh is the name of the eastern freeway   | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

महाविकास आघाडी सरकारने ठेवली विलासराव देशमुखांची आठवण 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 8 मार्च 2021

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प 2021 विधानसभेत सादर केला. राज्यातील रस्तेवाहतूक, रेल्वे वाहतूक संबंधी अनेक मोठ्या घोषणा त्यांनी यावेळी केल्या.

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प 2021 विधानसभेत सादर केला. राज्यातील रस्तेवाहतूक, रेल्वे वाहतूक संबंधी अनेक मोठ्या घोषणा त्यांनी यावेळी केल्या. मुंबई-नागपूर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम ४४ टक्के पूर्ण झाले आहे. 700 किमी पैकी 500 किमीचे काम पुर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी मार्ग महाराष्ट्र दिनी (1 मे 2021) रोजी खुला करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. दक्षिण मुंबईला पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्या पूर्व मुक्त मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. 

नांदेड ते जालना 200 किमी लांबीच्या नव्या मार्गाची निर्मिती

नांदेड ते जालना 200 किमी लांबीच्या नव्या मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. गोव्याला जाण्यासाठी 540 किमीच्या समुद्री मार्गासाठी 9540 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्यातील रस्त्याची नियमिती देखभाल करण्यासाठी निधी उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांअंतर्गत वित्तीय विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. रस्ते विकासासाठी १२ हजार कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. पुणे-नगर-नाशिक दरम्यान 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. या पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी 16 हजार 139 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

नैसर्गिक आपत्ती मदत व इतर खर्चासाठी ११ हजार तीनशे १५ कोटी

कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना ५ हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली. नैसर्गिक आपत्ती मदत व इतर खर्चासाठी ११ हजार तीनशे १५ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नैसर्गीक आपत्ती निवारणासाठी एनडीआरफचे एक पथक महाड येथे तैनात करण्यात येणार आहे.   

भुयारी मार्गाच्या कामासाठी 595 कोटी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साडे दहा किलोमीटर लांबीच्या दोन भुयारी मार्गाच्या कामासाठी 595 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून ते डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.   

पुण्याबाहेरुन रिंग रोडसाठी 26 हजार कोटी 
 
पुण्याबाहेरुन रिंग रोडची उभारणी काळाची गरज आहे. त्यासाठी 170 किमी लांबीच्या 26 हजार कोटी किमतीच्या आठ पदरी रिंग रोडचे काम करण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादनाचे काम याच वर्षी हाती घेण्यात येणार आहे. 

ग्रामविकास विभागासाठी 7350 कोटी

रुंदीकरण व नागरी विकास योजना राबवण्याचे सन 2020 -21 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या वर्षी या कार्यक्रमाला गती देण्याचा शासनाचा विचार आहे. ग्रामीण भागातील रस्ते विकासाची विविध कामे पूर्ण करण्याचे मी गेल्या अर्थसंकल्पात जाहीर केले होते. पण, गेल्या वर्षी कोरोनामुळे कामे हाती घेता आली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यातील दहा हजार किलोमीटर लांबीची रस्त्यांची कामे यावर्षी २०२१ मध्ये हाती घेण्यात येतील २०२१ या वर्षासाठी खर्चाकरिता ग्रामविकास विभागासाठी 7350 कोटी रुपये देण्यात आले. 

मुंबई शहरातील वाहतूक सुविधा जागतिक दर्जाचे असावेत. त्यासाठी शिवडी न्हावा शेवा प्रकल्प पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे. मुंब्रा बायपास, मुंब्रा जंक्शन, कल्याण फाटा, पुलाची निर्मिती, महामार्गाचे रुंदीकरण तसेच कल्याण फाटा उड्डान पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख