फडणवीसांनी आहे तिथे सुखी राहून भूमिका मांडवी! - Vijay Vadettiwar's criticism of Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

फडणवीसांनी आहे तिथे सुखी राहून भूमिका मांडवी!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 जून 2021

कर्नाटकने ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना केली होती. त्याच धर्तीवर आपणही केली पाहिजे. जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होणार नाही, आरक्षणाचा तिढा सुटत नाही.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ओबीसी (OBC) समाजाच्या राजकीय आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्यांपेक्षा जास्त झाल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यावरुन ''मी मंत्री जरी असलो तरी ओबीसीसाठी लढत राहणे माझे कर्तव्य आहे. आरक्षणाचा तिढा सुटत नाही; तोपर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नये'', असे मत काँग्रेस नेते आणि राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी मांडले आहे. (Vijay Vadettiwar's criticism of Devendra Fadnavis)

माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, कर्नाटकने ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना केली होती. त्याच धर्तीवर आपणही केली पाहिजे. जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होणार नाही, आरक्षणाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नये. महाराष्ट्रातील सर्व नेते, सर्व पक्षातील कार्यकर्ते, फोन करुन माझ्याकडे ही भूमिका मांडत आहेत. असेही वडेट्टीवार म्हणाले.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रविराज तावरेंवर बारामतीत गोळीबार

ओबीसींना कायद्याने 27 टक्के आरक्षण दिले आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आयोग नेमावा. मनमोहन सिंग सरकारने 2014 मध्ये आर्थिक सर्वे केला होता. तो डाटा केंद्र सरकारकडे आहे. तो डाटा केंद्राने राज्य सरकारला दिला तर मार्ग सोपा होऊ शकतो. तो देण्यास केंद्र सरकारकडून टाळाटाळ होते आहे. कारण, त्यांची भूमिका ही आरक्षाणाविरोधी आहे, अशी टीका त्यांनी केली. आमच्याकडे गाव पातळीवर आणि शहर पातळीवर 10 दिवसांत जातनिहाय जनगणना होऊ शकते. त्यात सर्वेक्षणात वेळ लागणार नाही, एक महिन्यात प्रश्न सुटू शकतो. एका महिन्यात सर्वोच्च न्यायालयात ते दाखल केले, तर कुठलीही अडचण येणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.  
  
पंचायत राज काद्यामध्ये घटनादुरुस्ती झाली असती तर प्रश्न निर्माण झाल नसता. ओबीसींची नेमकी संख्या किती हा पुरावा आम्हाला द्यावा लागेल. आरक्षणाचा तिढा ओबीसीसाठी अडचणींचा ठरला आहे. इतर आरक्षणाशी तुलना नाही. आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पत्र लिहिणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

हे ही वाचा : आमदार अनिल भोसलेंना आणखी एक दणका: शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेचा परवाना रद्द 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविषयी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, अबोल माणूस बोलका झाला, की शब्द घसरतात आणि बॅलन्स बिघडतो. सत्ता नसल्याच्या नैराश्यातुन ते ही भूमिका मांडत आहेत. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्या विषयी विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, फडणवीस यांनी आहे तिथे सुखी राहावे आणि आपली भूमिका मांडत राहावी. 

 
ओबीसीचे आरक्षण रद्द होण्यास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केला होता. या विषयीच्या समितीमध्ये आम्हाला घ्या, आमच्या सूचना मागवा, आम्ही मार्ग सुचवू, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला होता. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, पंकजा मुंडे यांचा अभ्यास मोठा आहे. ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. गोपीनाथ मुंडे यांचीही हीच भूमिका होती. त्यामुळे ओबीसींची जनगणना आवश्यक आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख