एका ब्लू टिकमुळे राजकारण ढवळले.. - vice president venkaiah naidu twitter account blue tick controversy rss | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

एका ब्लू टिकमुळे राजकारण ढवळले..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 जून 2021

भाजपने व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त केली.

नवी दिल्ली  :  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या टि्वटर अकाऊंटवरील ब्लू टिक शनिवारी अचानक गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले, पण ट्विटरनेच  ही कारवाई  केली होती, ज्यामुळे मोठा वाद निर्माण  झाला होता. व्यंकय्या नायडूच्या ट्विटरवरील कारवाईवरुन राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु असतानाच ट्विटरने त्यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक पुन्हा केली असल्याचे दिसत आहे.  ब्लू टिक का काढली याबाबत टि्वटरने आपले म्हणणे मांडण्याच्या प्रयत्न केला आहे. vice president venkaiah naidu twitter account blue tick controversy rss

सरकारने आणि भाजपने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त केली. याबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरकडे नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी ट्विटरवर योग्य कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता.  त्यानंतर ट्विटरने आपली चूक दुरुस्त केली.  टि्वटरने केवळ व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरीलच ब्लू टिक काढलेली नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विटरने 'ब्लू टिक' काढला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या खात्यावरील ब्लू टिक काढून टाकली असल्याचे संघाचे राजीव तुली यांनी म्हटले आहे. 

ट्विटरच्या अटींनुसार, जर कोणी त्याच्या हँडलचे नाव बदलले (@ हँडल) किंवा वापरकर्त्याने त्याचे खाते ज्या पद्धतीने वेरिफाई केले त्या पद्धतीने वापरत नाही. तर या प्रकरणात निळा टिक म्हणजे blue verified badge काढून टाकते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या या ट्विटर अकाऊंटवरून गेल्या 11 महिन्यांपासून कोणतेही ट्विट केलेले नाही. या खात्यात अखेर 23 जुलै 2020 रोजी ट्विट केले गेले होते. 

जुलै 2020 पासून ट्विटर अकाऊंट वापरात नसेल, तर ते अकाऊंट आपोआप इनअॅक्टीव्ह होते आणि त्यावरील ब्लू टिक गायब होते, असे ट्विटरने म्हटले आहे. ट्विटरच्या नियमांनुसार एखाद्या खात्याचे नाव बदलले गेले असेल किंवा एखादं अकाऊंट सक्रिय नसेल वा अपडेट होत नसेल, तर ते अनव्हेरिफाइड केले जाते आणि ‘ब्लू टिक’ही हटवली जाते. 

एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हॅण्डलसमोर ब्लू टिक असेल पण नंतर त्याने कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण केले जात नसतील, तर ब्लू टिक हटवली जाते. उपराष्ट्रपती झाल्यापासून व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपतींच्या हॅण्डलचाच वापर करत आहेत. त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलचा वापर होत नसल्यामुळे ब्लू टिक काढून टाकण्यात आली असावी, असे सांगितले जात आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख