वादग्रस्त ठेका अभियंत्याला आयुक्तांचा दणका ; सेवेतून केलं बडतर्फ

आयुक्तांनी युवराज पाटील यांना घरचा रस्ता दाखवला आहे.
Sarkarnama Banner - 2021-08-14T115514.650.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-14T115514.650.jpg

विरार  : वसई विरार महापालिकेवर वादग्रस्त ठेकेदाराला आयुक्तांनी सेवेतून कमी करुन घरचा रस्ता दाखविला आहे.  ठेकेदारावर  कारवाई करणारे आयुक्त आता वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांच्यावर कारवाई कधी करतात याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.

वसई विरार महापालिकेवर प्रशासकराज आल्यापासून याठिकाणी अनेक अधिकाऱ्यांच्या तक्रारी येत होत्या त्यातच आतापर्यंतच्या सत्तारूढ बहुजन विकास आघाडीला बाजूला सारून प्रशासकाच्या माध्यमातून पालिकेवर अंकुश ठेवण्याचे काम राज्यातील सत्तारूढ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत असल्याचे याठिकाणी बोलले जात असतानाच राज्यातील  बड्या मंत्र्यांचा वरदहस्त लाभलेल्या ठेका पद्धतीवरील कनिष्ठ अभियंता युवराज पाटील याला वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांनी सेवेतून कमी केले आहे. या घटनेमुळे मंत्र्यासह वादग्रस्त अधिकाऱ्यांनाही चपराक बसल्याचे मानले जात आहे. 
     
ठेका पद्धतीवर काम करीत असलेले कनिष्ठ अभियंता युवराज पाटील आणि स्वरुप खानोलकर यांनी अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत महापालिकेतील काही बड्या अधिका-यांसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या मंत्र्यांना हाताशी धरून वसईच्या पूर्वपट्टीत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पाटील, खानोलकर जोडगोळीविरोधात तक्रार करूनही त्याची दाद कुणीही घेत नव्हते. त्यामुळे दोन्ही ठेका अभियंता सहाय्यक आयुक्तांनाही जुमानेसे झाले आहेत. अखेर आयुक्त गंगाथरन डी. यांनी युवराज पाटीलवर शुक्रवारी संध्याकाळी कारवाईचा बडगा उगारला. प्रभाग समिती एफ कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण आदींवर कारवाई करण्यात आपण अकार्यक्षम असल्याचे आढळून आले आहे. नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर केल्याने 13 ऑगस्टपासून सेवेतून कमी करण्यात येत असल्याचा आदेश काढत आयुक्तांनी युवराज पाटील यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

जप्तीच्या नोटीसमुळे राष्ट्रवादीचे नेते जानकर अडचणीत ; नऊ कोटींचे कर्ज थकविले
अनधिकृत बांधकामांची पाहणी करून अहवाल सादर करणे, एमआरटीपीचे गुन्हे दाखल करणे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फेरीवाले, दैनंदिन बाजार, आठवडे बाजार यांच्यावर पोलीस बंदोबस्तात दंडात्मक कारवाई करणे, आदी दैनंदिन कामासाठी तत्कालीन सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांनी दहा जणांचे पथक तयार करून युवराज पाटील यांच्यावर ही जबाबदारी 14 मे 21 रोजी सोपवली होती. पण, पाटील यांनी संखे यांचे आदेश धुडकावत अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचेच काम केले होते. 

पाटील यांच्या कार्यकाळात पेल्हार परिसरात अनधिकृत बांधकामांना उत आला असताना नोटीसा अथवा एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्याचे काम झाले नव्हते. गेल्या महिन्यात अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांच्यासह खानोलकर आणि पाटील यांचे अऩधिकृत बांधकामांशी असलेले साटेलोटे संखे यांच्या वायरस झालेल्या व्हिडीओ क्लिपनंतर चव्हाट्यावर आले होते. तेव्हा आयुक्त गंगाथरन यांनी एकतर्फी कारवाई करीत संखे यांची उचलबांगडी केली होती. 

त्याआधी तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी खानोलकर आणि पाटील यांची चाळमाफियांच्या मद्यधुंद अवस्थेतील पार्टीची दखल घेत दोघांसह बारा ठेका अभियंतांना कामावरून कमी केले होते. पण, राजकीय दबाब आल्याने लोखंडेंसारख्या आयएएस अधिका-यावर या ठेका अभियंत्यांना पुन्हा कामावर घेण्याची नामुष्की आली होती. त्यामुळे गंगाथरन यांनी पाटील यांना कामावरून कमी केले असले तरी बड्या मंत्र्यांशी जवळकीचे संबंध असलेलया  पाटील यांना आयुक्त तथा प्रशासक पुन्हा कामावर घेणार का? कि अजून काही अधिकाऱ्यांना घरी बसवणार याचे चित्र काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. पाटील यांच्यावर कारवाई करणारे आयुक्त आता वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांच्यावर कारवाई कधी करतात याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com