निकृष्ठ दर्जाच्या किट्‌स वापरल्या, चौकशी करा, दरेकरांची मागणी  - Use inferior quality kits, inquire, demand from everyone | Politics Marathi News - Sarkarnama

निकृष्ठ दर्जाच्या किट्‌स वापरल्या, चौकशी करा, दरेकरांची मागणी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

याबाबत पत्रकारांना माहिती देताना दरेकर म्हणाले, की हे किट्‌स खराब असल्याचा रिपोर्ट आल्यावर हे कीट पुण्यात वापरले गेले अशी माहिती पुढे आली आहे.

मुंबई : 1 ऑक्‍टोबरनंतर राज्य सरकारने किट्‌स खरेदी केल्या,त्या निनकृष्ट दर्जाच्या होत्या. अशा किट्‌स वापरल्या गेल्या ही घटना जालना लक्षात आली. तिथे 25% positive rate होता तो 5% पर्यंत आला.

तेव्हा तिथल्या डॉक्‍टरांनी जेव्हा डॉ. तात्याराव लहाने यांना माहिती दिली तेव्हां यांनी दुर्लक्ष केलं त्यांना जेव्हा किट्‌स बाबत कळवण्यात आलं तेव्हा त्या डॉक्‍टरला त्यांनी झापल अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

याबाबत पत्रकारांना माहिती देताना दरेकर म्हणाले, की हे किट्‌स खराब असल्याचा रिपोर्ट आल्यावर हे कीट पुण्यात वापरले गेले अशी माहिती पुढे आली आहे. ह्यातून सरकारचा बेफिकिरपणा दिसून येतो. आरोग्यमंत्री राजेश टोपे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे बोट दाखवतात, तर मंत्री अमित देशमुख आरोग्य विभागाकडे बोट दाखवत आहेत. 

खरंतर ही मंडळी एकमेकणावर ढकलून लोकांचे आरोग्य धोक्‍यात आणत आहेत. याची चौकशी झाली पाहिजे असेही दरेकर म्हणाले. 

वैदकीय शिक्षण आणि आरोग्य विभागातील संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. 5 लाख किट पकडले, हजारोच्या संख्येने रुग्ण मृत्यूला सामोरे गेले असतील याबाबत एसआयटीमार्फत चौकशी व्हावी. तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले. 

अतिवृष्टीचा व्हीसीवर आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा व्हीसीवर आढावा घेतला आहे. पंचनामे अजून झाले नाहीत. ते तातडीने करावेत असा आदेशही त्यांनी दिला आहे. 

विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहार दौरा सोडून शेतकऱ्यांसाठी 19,20 आणि 21 ऑक्‍टोबररोजी राज्याचा दौरा करणार आहेत. साडे आठशे ते नऊशे किमी फडणवीस प्रवास करणार आहेत. सत्ता येण्यापूर्वी जे शेतकरी प्रश्‍नावर बोलत होते त्यांना आता विसर पडला असल्याची टीका भाजपने केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख