Urmila Matondkar slams central government over petrol prices
Urmila Matondkar slams central government over petrol prices

अक्कड़ बक्कड़ बंबे बो, डीजल नब्बे पेट्रोल सौ...उर्मिला मातोंडकर यांची फटकेबाजी

अभिनेत्री व शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी खास शैलीत इंधन दरवाढीवरून टीका केली आहे.

मुंबई : अभिनेत्री व शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी खास शैलीत इंधन दरवाढीवरून टीका केली आहे. ''अक्कड बक्कड बंबे बो, डीजल नब्बे पेट्रोल सौ, सौ मे लगा धागा, सिलेंडर ऊछल के भागा,'' असे ट्विट करत त्यांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

मागील काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढत चालले आहेत. भोपाळसह अन्य काही शङरांमध्ये प्रिमियम पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर राजस्थानमध्ये बुधवारी सामान्य पेट्रोलचे दरही १०० रुपयांवर पोहचले. तर डिझेलचे दर ९२ रुपयांवर गेले. त्यामुळे विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. दरवाढीविरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे.

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या खास शैलीत इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारला धारेवर धरले. त्यांनी केलेले ट्विट व्हायरल झाले आहे. "अक्कड बक्कड बंबे बो, डीजल नब्बे पेट्रोल सौ, सौ मे लगा धागा, सिलेंडर ऊछल के भागा" असे ट्विट त्यांनी केले आहे. 

दरम्यान, इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारलाच कर कमी करण्याचा सल्ला दिला होता. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारकडून वाढत्या इंधन दरांवर चिंता व्यक्त करण्यात आली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा हा परिणाम असल्याचे म्हटले आहे. 

उर्मिला मातोंडकर यांचे हे ट्विटही व्हायरल

पंजाबमधील महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. सात महापालिकांच्या मतमोजणीमध्ये भाजपला एकाही ठिकाणी खाते खोलता आले नाही. सातही महापालिकांवर काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. तर भठिंडा महापालिका तब्बल ५३ वर्षांनंतर काँग्रेसच्या ताब्यात आली आहे. 

पंजाबमधील निकालानंतर बाॅलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांचे एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे की, ''#PunjabMunicipalElection2021 चा जनादेश स्पष्ट आहे. #FarmersMakelndia'' अशा प्रकारे मातोंडकर यांनी पंजाबमधील भाजपच्या पराभवाचा संबंध भेट थेतकरी आंदोलनाशी जोडला आहे. त्यामुळे मातोंडकर यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com