'गो कोरोना' म्हणणाऱ्या आठवलेंनाही घ्यावी वाटतेय लस 

पुढे या घोषणेची अनेकांकडून खिल्लीच उडविण्यात आली होती.
Union Minister of State Ramdas Athavale will take the corona vaccine tomorrow
Union Minister of State Ramdas Athavale will take the corona vaccine tomorrow

मुंबई : "गो कोरोना'चा नारा देणारे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही अखेर कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचा निर्णय घेतला आहे. ते पत्नीसह उद्या (शुक्रवारी, ता. 12 मार्च) लस घेणार आहेत. 

दरम्यान, गेल्या वर्षी कोरोनाचे रुग्ण देशात आढळल्यानंतर रामदास आठवले यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात आपल्या शैलीनुसार कोरोनावर शीघ्रकविता केली होती. त्यात त्यांनी "गो कोरोना' असा नारा दिला होता. पुढे या घोषणेची अनेकांकडून खिल्लीच उडविण्यात आली होती. 

गो कोरोना म्हणाऱ्या आठवले यांना कोरोना विषाणूने 27 ऑक्‍टोबर रोजी गाठले होते. उपचारानंतर ते कोरोनावर मात करत घरी परतले होते. मात्र, देश आणि मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता धोका नको; म्हणून आठवले यांनी कोरोनाची प्रतिबंधक लस घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबईतील जे. जे. रुग्णायलयात शुक्रवारी (ता. 12 मार्च) दुपारी 2 वाजता कोरोना प्रतिबंधक लस घेणार आहेत. आठवले यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सीमा याही लस घेणार आहेत. 

"देशात कोरोनाच्या केसेस पुन्हा वाढू लागल्या आहेत. महाराष्ट्रातही कोरोना मोठया प्रमाणात वाढत आहे. देशातील कोरोनाच्या एकूण केसेसपैकी एकट्या महाराष्ट्र राज्याच्या 60 टक्के केसेस आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे राज्य सरकार कोरोना रोखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे,'' अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे. 

विधानसभा, लोकसभेतही मिळावे महिलांना आरक्षण 

महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळाले आहे. त्यात महिला कर्तबगारी दाखवत आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. विधानसभा आणि लोकसभेत मात्र महिलांना आरक्षण देण्याचा कायदा अद्याप प्रलंबित आहे. महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण देणारा कायदा संसदेत मंजूर करावा, यासाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. 

दरम्यान, महिलांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचे शोषण थांबले पाहिजे, यासाठी रिपब्लिकन पक्ष कटीबद्ध आहे, अशी ग्वाहीही आठवले यांनी दिली. 

महिलांच्या न्याय हक्कासाठी भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल सादर केले होते. ते हिंदू कोड बिल तत्कालीन सरकारने संसदेत मंजूर केले नाही; म्हणून डॉ आंबेडकरांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेतील आमचा पक्ष असून महिलांच्या न्याय, हक्कासाठी खंबीरपणे उभा राहणारा आहे, असे आठवले यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com