union minister ramdas athawale on India-china dispute | Sarkarnama

40 सैनिकांना ठार करुन चीनला धडा शिकवला : रामदास आठवले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 जून 2020

भारतीय सैन्याने आपले बळ दाखविलेली गलवान घाटी ही भारताची बलवान घाटी ठरली असून आम्हाला या गलवान घाटीचा अभिमान आहे.

मुंबई : लडाखची गलवान घाटी ही भारताची बलवान घाटी ठरली आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केले आहे.

गलवान घाटी मध्ये चीनी सैन्याशी झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले मात्र भारतीय शूर सैनिकांनी चीनच्या 40 सैनिकांना ठार करुन चीनला धडा शिकवला आहे. त्यामुळे भारतीय सैन्याने आपले बळ दाखविलेली गलवान घाटी ही भारताची बलवान घाटी ठरली असून आम्हाला या गलवान घाटीचा अभिमान आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे. चीनचे अनेक सैनिक भारतीय सैन्याच्या हल्ल्यात गलवान येथे ठार झाल्याची कबुली ची ने दिली असून ती कबुली भारतीय सैन्याच्या शौर्याचा चीनने दिलेला पुरावा आहे, असे आठवले म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वादंग शमेना 
पुणे : "स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील बड्या नेत्यांमुळे मला मंत्रिपद मिळाले नाही असा आरोप आमदार देवेंद्र भुयार यांनी केला होता. त्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'देवेंद्र भुयार यांची समजूत काढू. ते नवखे आहेत" असे म्हटले आहे. मात्र या दोन नेत्यांच्या  विधानानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील एक नवा वाद समोर आला आहे. हा वाद मिटविण्याचे आव्हान राजू शेट्टी यांच्यासमोर आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांची समजूत काढण्यात शेट्टी यांना यश आले पण आमदार देवेंद्र भुयार यांची समजूत ते कशी काढणार हा प्रश्न आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनीही, "आम्हाला महाविकास आघाडीकडून एक मंत्रिपद मिळणार होते मात्र आमच्या नेतेमंडळीनी ते गांभीर्याने घेतले नाही" असे सरकारनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत विधानपरिषदेची जागा कोणी स्विकारायाची यावरून वाद सुरू झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील सावकार मादनाईक आणि जालंधर पाटील यांनी बंड केले. हे बंड मिटत असतानाच दरम्यानच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांनी, "स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील बड्या नेत्यांच्यामुळे मला मंत्रिपद मिळाले नाही" असे विधान केले. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानीतील वाद हे सगळे पूर्वनियोजित होते." असेही ते म्हणाले. यावर शेट्टी यांनी,"भुयार नवखे आहेत. त्यांची समजूत काढू' असे म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील कोल्हापूर जिल्ह्यातील वाद मिटला असला तरी देवेंद्र भुयार यांच्या निमित्ताने अजून एक नेता पक्षातील नेत्यांवर नाराज आहे हे स्पष्ट झाले आहे. देवेंद्र भुयार हे मोर्शी मतदारसंघाचे आमदार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख