राऊतांना कळेल की हे खातं किती महत्वाचं..नारायण राणेंचं उत्तर - Union Minister Narayan Rane reply to MP Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

राऊतांना कळेल की हे खातं किती महत्वाचं..नारायण राणेंचं उत्तर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जुलै 2021

मी जेव्हा या खात्याला न्याय देईन तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचं आहे.

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. नारायण राणे Narayan Rane यांना सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना देण्यात आलेल्या या खात्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत MP Sanjay Raut यांनी खोचक टीका केली होती. त्याला नारायण राणे यांनी उत्तर दिलं आहे. राणे आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. Union Minister Narayan Rane reply to MP Sanjay Raut

नारायण राणे म्हणाले, "कोणतंही खातं छोटं किंवा मोठं नसतं. मी जेव्हा खात्याचा कार्यभार पाहिन आणि मी जेव्हा या खात्याला न्याय देईन तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचं आहे.'' राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'चांगले काम करा,' असे फोन करुन सांगितले, असे राणे म्हणाले.

''महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून मला अभिनंदनाचे फोन आले, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला मंत्रीपद मिळाल्याबाबत अभिनंदन केलं नाही. ठाकरेंचं मन एवढं मोठ नाही," असा टोला राणे यांनी यावेळी लगावला. 

काय म्हणाले होते संजय राऊत
नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. राणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी, तर इतर तिघांना राज्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून या चार जणांचा समावेश मंत्रीमंडळात झाल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, ''भारती पवार, कपिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राँडक्ट आहे. तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मिळालेलं खात त्यांच्या कारकिर्दीला साजेसं नाही."

'राष्ट्रवादी'त गेल्याने ''कुछ तो होनेवाला है'' असा मेसेज फिरत होताच..
 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीनं काल समन्स बजावले आहे. ते ईडीच्या कार्यालयात चैाकशीसाठी हजर राहण्यासाठी ते ईडीच्या कार्यालयात गेले आहे. ''ईडीला चैाकशीत पूर्ण सहकार्य करणार'' असे खडसेंनी सांगितलं. ते माध्यमांशी बोलत होते. 

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख