भाजप जिल्हा उपाध्यक्षावर प्राणघातक हल्ला.. - Ulhanagar Fatal attack on BJP leader  | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप जिल्हा उपाध्यक्षावर प्राणघातक हल्ला..

अजय दुधाणे
सोमवार, 15 मार्च 2021

भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उल्हासनगर : उल्हासनगरचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर क्षुल्लक वादातून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केल्याची माहिती जयकुमार शर्मा यांनी दिली आहे. प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'रक्षककर्तेच झाले भक्षक'..बलात्कारीत युवतीकडून शरीरसुखाची मागणी..पोलिस अधिकाऱ्याला अटक

उल्हासनगर कॅम्प-३ इंदिरा गांधी भाजी मार्केट परिसरात जयकुमार शर्मा यांनी काही खोल्या भाडेतत्वावर दिल्या आहेत. भाडेकरू यांना काही महिन्यापासून रात्रीच्या वेळी सुमारास काही अज्ञात व्यक्तीं घराची कडी वाजवून त्रास देत असल्याची तक्रार जयकुमार शर्मा यांच्याकडे केली होती.

वरूण सरदेसाई यांचे WHATS APP कॉल, CDR रिपोर्ट तपासा...

जयकुमार शर्मा आपल्या खोलीकडे गेले असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार करून गंभीर जखमी केले. जयकुमार शर्मा यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हेही वाचा : भाजपची भूमिका कायमच संशयास्पद...
 

मुंबई : सचिन वाझे यांचे निलंबन नियमानुसार क्रमप्राप्तच होते. त्याकरिता मागणी करावी लागत नाही. सुशांत सिंग प्रकरणामध्ये अख्खी एक निवडणूक लढवली गेली. आता या प्रकरणाचे काय झाले? या साऱ्या प्रकाराबाबत भाजपची भूमिका कायमच संशयास्पद राहिली असून त्यांनी वेळोवेळी केवळ राजकारणच केले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. एनआयए व मुंबई पोलिसांना त्यांचे काम करू द्यायला हवे व त्यामध्ये कुणीही ढवळाढवळ करू नये, असेही जगताप यांनी नमूद केले.  उपनगरातील काही माॅल्समध्ये लोक खरेदीसाठी मोठी गर्दी करत असून असे गर्दी होणारे माॅल्स, डिपार्टमेन्टल स्टोअर्स तातडीने बंद केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी सुरक्षित वावर, मास्क वापरणे, सॅनिटायझर, आदींचा उपयोग करून कोरोनाला परतावून लावावे, असे आवाहनही जगताप यांनी केले.       

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख