`उद्धव ठाकरेंना राज्य कसे चालवावे, हे कळत नाही म्हणून....`

नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत आहेत.
rane-koshiyari
rane-koshiyari

पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारबाबत थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. राज्यपाल माननीय भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील कोरोनाच्या परिस्थितिविषयी चर्चा केली.

``महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा. ठाकरे सरकार कोरोनाचे संकट हाताळू शकत नाही, त्यांच्यात क्षमता नाही. कोरोनाचा सामना करण्यास सरकार अपयशी ठरलं आहे, त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली. राज्य कसे चालवावे, पोलीस यंत्रणा कशी हाताळावी, हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही. मनपा व राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. ही सर्व रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. तरच परिस्थिती सुधारू शकते, अशी विनंतीही राज्यपालांना केली. 

दुसरीकडे त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनीही तशीच मागणी केली. भारतीय कागार सेनेच्या एका पदाधिकाऱ्याचा उपचाराविना मुत्यू झाल्याने सेनेच्याच एका पदाधिकाऱ्यांने राज्य सरकारचा निषेध करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुर्ची सोडण्याचे आवाहन केले आहे. आपण भारतीय कामगार सेनेचा कार्यकर्ता असल्याचे हा कार्यकर्ता या व्हीडीओत सांगत आहे. समाज माध्यमांवर फिरत असलेला हा व्हीडीओ माजी खासदार निलेश राणे यांनीदेखील ट्विट केला आहे.

मुंबई परिसरातील एका कंपनीतील हा कर्मचारी सध्या घरीच होता. काम नसल्याने तो कलिंगड विक्री करीत होता. चार दिवसांपासून आजारी असल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र, कोणत्याही रूग्णालयाने त्यास दाखल करून घेतले नाही.त्यामुळे रूग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने उद्विग्न झाल्याने या कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांने हा व्हीडीओ प्रसारीत करून राग व्यक्त केला आहे. आमची ही परिस्थिती असेल तर सामान्य माणसाला काय अनुभव येत असतील, असा प्रश्‍न या कार्यकर्त्यांने केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. छान बोलत आहेत. आमची सहानुभूती आहे. मात्र, नुसत्या बोलण्याचे काहीच होत नाही. प्रत्यक्षात लोकांचे खूप हाल होत असून त्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. खासगी रूग्णालयात चार-चार लाख रूपये बिल करण्यात येत आहे. सामान्य माणासाला जगणे मुश्‍कील झाले आहे.जे सरकार लोकांच्या अडचणीच्या काळात कामाला येत नाही, असे सरकार कशाला हवे, असा प्रश्‍न या व्हीडीओत करण्यात आला आहे. जे शक्य असेल तेच सांगा फुकट आश्‍वासने देऊ नका. इतके हतबल सरकार पहिल्यांदाच पाहिले असून या सरकारचा निषेध करतो, असे म्हटले आहे.

हा व्हिडीओ शनिवारी रात्रीपासून समाज माध्यमावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावर मोठ्या संख्येने प्रतिक्रिया येत असून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने माजी खासदार निलेश राणे यांनी हा व्हीडीओ ट्‌विट केला आहे. राणे आणि शिवसेना यांचे सख्य सर्वज्ञात आहे. त्यात भारतीय कामगार सेनेचा कार्यकर्ता सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात बोलत असल्याने राणे यांनी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com