उद्धव ठाकरेंची इमेज घसरल्याने सोशल मीडियासाठी साडेपाच कोटींचे कंत्राट काढले, सौमैय्यांचा आरोप 

सौमैय्या हे शिवसेनेला नेहमीच लक्ष करीत असतात
उद्धव ठाकरेंची इमेज घसरल्याने सोशल मीडियासाठी साडेपाच कोटींचे कंत्राट काढले, सौमैय्यांचा आरोप 

मुंबई : मुख्यमंत्र्यांची इमेज घसरत चालल्यामुळे साडेपाच कोटींचे सोशल मिडियासाठी कंत्राट काढण्यात आले असून कोव्हीड -19साठी चांगले काम केले असते तर त्यांची इमेज घसरली नसती अशी टिका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेचे विरोध अशी प्रतिमा असलेले किरीट सोमैय्या यांनी आज केली आहे. 

कोव्हिडसाठी संघर्ष करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. प्रामाणिक काम करा असा सल्ला देताना सोमैय्या म्हणाले, की सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना जेलमध्ये टाकणे बंद करा, अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणात इमानदारीने तपास करा, नेव्ही अधिकाऱ्यांची मारहाण थांबवा, चांगल काम केले तर इमेज घसरणार नाही आणि इमेज सुधारण्यासाठी कोट्यवधी द्यावे लागणार नाहीत याकडेही सोमैय्या यांनी लक्ष वेधले आहे. 

सौमैय्या हे शिवसेनेला नेहमीच लक्ष करीत असतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेमुळेच त्यांचे लोकसभेचे तिकिट कापण्यात आले होते. शिवसेना आणि भाजप युती असो किंवा नसो सोमैय्या हे नेहमीच शिवसेनेला शिंगावर घेत असतात. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणीही त्यांनी यापूर्वी आवाज उठविला होता. मुंबई महापालिकेत शिवसेनेची गेल्या अनेक वर्षापासून सत्ता आहे. शिवसेना भाजप एकत्र असताना शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर असे. मात्र महापालिकेतही युती नाही. 

शिवसेना भाजपपासून दूर गेल्याने सोमैय्याच काय सर्वच भाजप नेते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर तुटून पडत असतात. आजही ठाकरेंच्या इमेजवरून सोमैय्या यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष केले आहे. 

हे वाचा: 
मुंबई महापालिकेचा मुंबईकरांना दिलासा 

यंदा मालमत्ता कराच्या दरात वाढ न करण्याचा मुंबई महापालिका प्रशासने निर्णय घेतला आहे तसा राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यामुळं मागील 5 वर्षे जितका कर भरावा लागत होता, तितकाच मालमत्ता कर भरावा लागणार आहे. दर पाच वर्षानी मालमत्ता कर दरात वाढ केली जाते. यंदाच्या वर्षी या दरवाढीची अंमलरजावणी केली जाणार नाही. कोरोना संरटामुळे १ वर्ष मुंबईकरांना वाढीव मालमत्ता कर भरावा लागणार नाही... 

मुंबईत४ लाख २० हजार मालमत्ता असून यापैकी १ लाख ३७ हजार मालमत्ता या ५०० चौरस फुटांच्या खालच्या आहेत.. त्यांना मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. यामुळे ऊर्वरीत 4 लाख 20 हजार मालमत्ता धारकांना दिलासा मिळणार आहे. दरवर्षी सुमारे 4 ते 5 हजार कोटी रूपयांचे उत्पन्न मालमत्ता कराद्वारे येते 
पुढील वर्षी मुंबईकरांचा मालमत्ताकर सरासरी 17 % वाढवला जाईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com