उद्धव ठाकरेंनी वडीलांप्रमाणे हिंमत दाखविली, किंचाळणाऱ्या बोक्‍याला पिंजऱ्यात टाकले !  - Uddhav Thackeray showed courage like his father, put the screaming goat in the cage! | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरेंनी वडीलांप्रमाणे हिंमत दाखविली, किंचाळणाऱ्या बोक्‍याला पिंजऱ्यात टाकले ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

राम गोपाळ वर्मा यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की अर्णब गोस्वामीवरील कारवाई पाहून मला समाधान वाटले.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे हिम्मत दाखविली आहे. रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली. कारवाई केलीत हे पाहून मला समाधान वाटलं असे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी म्हटले आहे. 

राम गोपाळ वर्मा यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की अर्णब गोस्वामीवरील कारवाई पाहून मला समाधान वाटले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांसारखी हिंमत दाखविली आहे. एका किंचाळणाऱ्या बोक्‍याला थेट पिंजऱ्यात टाकल आहे. 

वर्मा यांच्या टिट्‌वला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. समाजात घडणाऱ्या विविध घटनांवर ते नेहमीच प्रतिक्रिया देतात. कोणाची भिडभाड न ठेवता ते ट्‌विटही करीत असतात. अर्णब गोस्वामी यांच्यावर रायगड पोलिसांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले आहे.

वर्मा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत.बाळासाहेबांकडे जे धाडस होते तसेच धाडस उद्धव ठाकरे यांच्याकडेही असल्याचे वर्मा यांना म्हणायचे आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर अर्णब गोस्वामी यांनी बॉलिवूडमधील काही निर्माते, अभिनेत्यांनाही लक्ष्य केले होते. बॉलिवूडला गटार म्हंणणाऱ्या कंगना राणावतची बाजू घेत गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही एकेरी भाषेत उल्लेख करीत टीका केली होती. तसेच मुंबई पोलिसांवरही सातत्याने टीका करण्यात येत होती. 

अभिनेत्री कंगना राणावत हिने तर मुंबईला पीओक म्हटले होते त्यानंतर शिवसेना खवळली होती. शिवसेनेनेही आपल्या शैलीत राणावत हिचा समाचार घेतला आहे. सुशांतप्रकरणानंतर ज्या पद्धतीचे राजकारण झाले.

बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला त्याने नाराजी होती. आता अर्णब गोस्वामीवर कारवाई झाल्याने राम गोपाळ वर्मा यांनी समाधान व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांचेही कौतुक केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख