उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या खिशातून वकिलांची फी, भरपाई द्यावी 

आजचान्यायालयाचानिकाल हा सरकारच्या सुडाच्या कारभारावर झगझगीत प्रकाशझोत टाकणारा आहे.
Uddhav Thackeray should pay the lawyers' fees out of his own pocket
Uddhav Thackeray should pay the lawyers' fees out of his own pocket

मुंबई : "कंगना राणावत संदर्भातील आजच्या हायकोर्टाच्या निर्णयाने सुडाच्या राजकारणाची भाषा करणाऱ्या सरकारचे पुन्हा एकदा थोबाड फुटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचे प्रायश्‍चित्त घेऊन कंगना राणावतला द्यावयाची नुकसानभरपाई आणि वकिलांची फी स्वतःच्या खिशातून भरावी,' अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. 

अर्णब गोस्वामी यांच्या संदर्भातील निर्णयानंतर आज पुन्हा सरकारचे थोबाड फुटले आहे. आजचा निकाल हा सरकारच्या सुडाच्या कारभारावर झगझगीत प्रकाशझोत टाकणारा आहे. कंगना राणावतचे ऑफीस पाडण्याच्या कारवाईमागचा बोलवता धनी म्हणजे सुडाच्या राजकारणाची भाषा करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचे प्रायश्‍चित्त घेतले पाहिजे आणि कंगनाच्या न्यायालयीन प्रकरणात आतापर्यंत वकिलांवर झालेला खर्च, जो जनतेच्या पैशातून करण्यात आला, त्याची भरपाई आता उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या खिशातून करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून ही मागणी केली आहे. 

"उखाड दिया' म्हणणाऱ्यांनाच उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाद्वारे "उखाड दिया हैं' अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

आपला अहंकार जपण्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही पाडकामाची कारवाई घडवून आणली होती. सरकारच्या विरोधात टीका करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, मारहाण करणे, जेलमध्ये टाकणे व या ना त्या मार्गाने लोकांचा आवाज दडपण्याचे काम हे ठाकरे सरकार करत आहे. ठाकरे सरकारकडून राज्यात छुपी आणीबाणी लागू केली गेली आहे, असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com