स्वत:च उद्धव ठाकरे यांनी सुशांत सिंग प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना  निर्दोष ठरवले : नारायण राणे  - Uddhav Thackeray himself acquits Aditya Thackeray over Sushant Singh case :Narayan Rane | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल
बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

स्वत:च उद्धव ठाकरे यांनी सुशांत सिंग प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना  निर्दोष ठरवले : नारायण राणे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

सुशांत सिंग प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत अजून सीबीआय क्लीन दिली नाही .स्वत:च उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे निर्दोष ठरवले आहे .लवकरच सत्य बाहेर येईल आणि जनतेला कळेल असे जळजळीत टीका त्यांनी केली. 

मुंबई  : आज घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये खासदार नारायण राणे यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरपूस समाचार घेतला. तसेच सुशांत सिंग प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत अजून सीबीआय क्लीन दिली नाही .स्वत:च उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे निर्दोष ठरवले आहे .लवकरच सत्य बाहेर येईल आणि जनतेला कळेल असे जळजळीत टीका त्यांनी केली. 

 कालच्या दसरा मेळाव्यातील भाषण फुसका बार आहे .राज्यातील अनेक प्रश्न आहेत. विकासकामे ,शिक्षणाचा प्रश्न,अर्थकारण,कोरोना याबद्दल कोणताही उल्लेख केला नाही,उलट जवळपास ४३ हजार रुग्ण कोरोना दगावली आहेत, त्यांची नैतिक जबाबदारी घेणार का असा सवाल राणे केला आहे . उद्धव  ठाकरे यांची मुख्यमंत्री  म्हणून घेण्याची लायकी नाही,पंतप्रधानाचे नाव वापरून ५६ आमदार आलेत, आता जर निवडणूक झालीच तर २५ आमदारही निवडून येणार नाहीत. बेईमानी करून मुख्यमंत्री झालेत अशी खरमरीत टीका राणे यांनी केली आहे. 

घरात बसून मुख्यमंत्रीपद चालवता येत नाही , महाराष्ट्राला उद्धव ठाकरे  रूपाने  पुळचट मुख्यमंत्री मिळाला आहे, हे महाराष्ट्रचे दुर्दैव आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून पिंजारात बंद होता. हा कसला वाघ , नेबळटं कुठला अशा शब्दात राणेनी मुख्यमंत्रीवर टीका केली. मी  शिवसेनेत ३९ वर्ष काम केले आहे.आतून बाहेरून मला सगळं माहिती आहे.कधी बाहेर काढू सागां हा कसला शिवसेना अध्यक्ष साधा कार्यकार्यांना भेटत नाही. बाळासाहेब असते तर त्यांनी कधीच उद्धवला मुख्यमंत्री पद दिले नसते. अशा शब्दात त्यांनी शरसंधान साधले.

पुढे बोलताना राणे म्हणाले ,मुख्यमंत्री कधीच मराठा आरक्षण देऊ शकणार नाहीत, कायदा ,घटना यातंले उद्धव ठाकरे यांना काही कळत नाही पिंजऱ्यात बसून कधीच कारभार करता येत नाही.  कालचे दसरा मेळाव्याचे  भाषण दिशाहीन , महाराष्ट्राला दिशाभूल करणारे आहे. या पुढे  भाजपच्या नेत्याला काही बोलला तर जसे तसे उत्तर देऊ ,शिवसैनिकच्या भावनांशी खेळतायं, कालचे भाषण  महाराष्ट्रला अधोगतीला नेणारे आहे. अशा शब्दात टीका केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख