"दोन जादा आमदारांच्या जीवावर उड्या मारू नका..'' राष्ट्रवादीचा शिवसेनेला इशारा..

महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय वादळाची शक्यता निर्माण झाली आहे.
1Ajit_20Pawar_20Uddhav_20Thackeray_20New.jpg
1Ajit_20Pawar_20Uddhav_20Thackeray_20New.jpg

मुंबई : राज्याला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसत असताना आता महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय वादळाची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी नामंजूर केल्याने महाविकास आघाडी सरकारला या वादळामुळे हादरा बसणार का, अशी चर्चा सध्या राजकीय क्षेत्रात सुरु आहे. uddhav thackeray did not accept the ncps demand for extension of water resources departments officer

सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला मुदतवाढ देता येणार नाही, असा शेरा संबंधित फाइलवर मुख्यमंत्र्यांनी  मारला आहे, हा शेरा बदलावा, असा आग्रह राष्ट्रवादी कॅाग्रेसचा आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या जलसंपदा विभागाच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला मुदतवाढ देण्याबाबतच मागणी राष्ट्रवादीने केली होती.  

"शिवसेनेचे ५६ आमदार असतील तर राष्ट्रवादी कॅाग्रेचेही ५४ आमदार आहेत, जास्तीच्या दोन आमदारांच्या जीवावर शिवसेनेने जास्त उड्या मारू नयेत," असा इशारा राष्ट्रवादीनं दिला असल्याचे समजते. हा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत कसा पोहोचेल, याची व्यवस्थाही अजितदादांनी केल्याचे समजते.  राष्ट्रवादीच्या या इशाऱ्यावर मुख्यमंत्री ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार, हे लवकरच समजेल.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याला मुदतवाढ देण्याबाबतची फाइल अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठवली, मात्र संबंधित अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला मुदतवाढ देता येणार नाही, असा शेरा मुख्यमंत्र्यांनी त्या फाइलवर मारला आहे.

या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर समुद्धी महामार्गाचे व्यवस्थापकीय संचालयक राधेश्याम मोपलवर यांच्यापासून ते इतर अनेक अधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू असताना त्यांना मुदतवाढ मिळू शकते, तर या अधिकाऱ्याला का नाही असा पवित्रा घेत हे प्रकरण राष्ट्रवादीकडून लावून धरण्यात आले आहे. 

जयंत पाटील यांनी त्यांच्या विभागाच्या सचिव दर्जाच्या अधिकारी सेवानिवृत्त होत आहे. त्यांना मुदतवाढ देण्याबाबतची मागणी केली जयंत पाटलांनी केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्याची अनियमिततेबाबत चौकशी सुरू असल्याने त्याला मुदतवाढ देता येणार नसल्याची भूमिका मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी घेतल्याचे समजते. 

कुंटे यांच्या या भूमिकेला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंग, अजोय मेहता यांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे आता  कुंटे यांनाच बदलून त्यांच्या ठिकाणी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्याबाबतची भूमिका जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच मांडली, जयंत पाटलांची ही भूमिका अजितदादांनी उचलून धरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com