Uddhav Thackeray and Congress ministers do not meet today! Tension in the lead? | Sarkarnama

 उद्वव ठाकरे आणि कॉंग्रेस मंत्र्यांची भेट नाही !

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 जून 2020

भाजपच्या शहकटशाहच्या राजकारणाला कंटाळून शिवसेनेने 2019 मध्ये विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपशी युती न करता थेट दोन्ही कॉंग्रेसबरोबर आघाडी करून मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले.

मुंबई : शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी सरकारमधील मतभेदाविषयी एकीकडे चर्चा होत असनाता मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी कॉंग्रेस मंत्र्यांची आजची भेट होऊ शकली नाही.  

भाजपच्या शहकटशाहच्या राजकारणाला कंटाळून शिवसेनेने 2019 मध्ये विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपशी युती न करता थेट दोन्ही कॉंग्रेसबरोबर आघाडी करून मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सत्तेवर येईल असे स्वप्न भाजपने पाहिले खरे पण त्यांना मॅजिक फिगरचा आकडा गाठता आला नाही. 

त्यावेळी शिवसेना विरोधीबाकावर बसली. राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते पण, प्रत्यक्षात भाजप आणि राष्ट्रवादी अशी कधी युती होऊ शकली नाही. पुढे शिवसेना ही भाजपसोबतच सत्तेत राहिली. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेने साथ दिली. मात्र विधानसभेचे निकाल जेव्हा जाहीर झाले तेव्हा 
कुठल्याच पक्षाला बहुमत नाही हे लक्षात येताच शिवसेनेने 2014 चा वचपा काढला. खरेतर भाजप बरोबर सत्ता स्थापन करणे शिवसेनेला सहज शक्‍य होते पण, शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेसबरोबर आघाडी करून मुख्यमंत्रीपद मिळविले आणि भाजपला कात्रजचा घाट दाखविला. 

राज्यात तीन रिक्षाचे सरकार असले तरी कॉंग्रेसचे मंत्री नाराज आहेत. तीन पक्षांचा विचार केल्यास कमी जागा कॉंग्रेसला मिळाल्या आहेत. आपणास निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही असे कॉंग्रेसला वाटते. 

दरम्यान, कॉंग्रेसच्या मंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची कालही भेट होऊ शकली नाही. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळेल म्हणून अनेक कॉंग्रेसचे मंत्री मुंबईत थांबले होते. पण भेट काही झाली नाही.  
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख