तुमचा उद्धव..आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे..

मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ??
33Nitesh_20Rane_20_20Uddhav_20Thakre_1_1.jpg
33Nitesh_20Rane_20_20Uddhav_20Thakre_1_1.jpg

मुंबई :  श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे  मुखपत्र ‘सामना’मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते. काल भाजपच्या मुंबई युवा मोर्चाचे कार्यकर्ते दादर येथील शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी पोहोचले. या आंदोलनाची कुणकुण लागताच शिवसेनेचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने बाचाबाचीला सुरुवात होऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. uddhav has rubbed his nose front our modi nitesh rane told shiv sena

या घटनेवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. कालच्या राड्यावर नितेश राणे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, जाऊन सांगा आज सेना भवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे.. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ??

भाजपच्या मुबईतील कार्यकर्त्यांचे नितेश राणे यांनी कैातुक केलं आहे. भाजपच्या मुंबईतील कार्यकर्त्यांना मानले, अशा शब्दात नितेश राणे यांनी त्यांचे कैातुक केलं आहे. 
शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काल मुंबईत झालेल्या संघर्षाने या दोन पक्षांतील अंतर आणखी वाढले असून  राम मंदिर जमिनीसाठी झालेल्या कथित गैरव्यवहरावरून `सामना`ने टीका केल्याने भाजप कार्यकर्ते शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी गेले. मात्र तेथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. यावरून दोन्ही पक्षांतील नेतेही सोशल मिडियात भिडले आहेत.

भाजपच्या युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजेंदर तिवाना यांच्यासह कार्यकर्ते काल मोठ्या संख्येने  मोर्चासाठी शिवसेना भवनसमोर जमले होते. शिवसेनेविरोधात घोषणा देत असतानाच तेथे शिवसेनेचे आमदार सदा सरणवकर, माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह कार्यकर्तेही मोठ्या संख्येने पोहोचले. घोषणाबाजी सुरू असतानाच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. धक्काबुक्की, हाणामारीमुळे या परिसरातील वातावरण तंग झाले होते.

पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यास सुरुवात करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. शिवसेना भवनासमोर हा प्रकार सुरू असताना परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले होते. संध्याकाळनंतर या परिसरातील गर्दी कमी झाली असली, तरी वातावरण तंग होते. तसेच या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com