TWITTER : "चिमणी गिधाडांना भारी पडली!..आव्हाडांचा भाजपला टोला.. - twitter new rules for social media it act ncp jitendra awhad twitter blue tick BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

TWITTER : "चिमणी गिधाडांना भारी पडली!..आव्हाडांचा भाजपला टोला..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 जून 2021

टि्वटर आणि भाजप यांच्यातील संघर्ष सुरु असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी  भाजपला टोला लगावला आहे.

मुंबई  : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या टि्वटर अकाऊंटवरील ब्लू टिक शनिवारी अचानक गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले, पण ट्विटरनेच  ही कारवाई  केली होती, ज्यामुळे मोठा वाद निर्माण  झाला होता. व्यंकय्या नायडूच्या ट्विटरवरील कारवाईवरुन राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु असतानाच ट्विटरने त्यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक पुन्हा केली. centre issues notice to twitter new rules for social media it act ncp jitendra awhad twitter blue tick

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विटरने 'ब्लू टिक' काढला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या खात्यावरील ब्लू टिक काढून टाकली. यामुळे राजकारण ढवळून निघालं. या कारवाईमुळे टि्वटरने भाजपला दणका दिल्याचे बोललं जात आहे.  केंद्र सरकार आणि ट्विटरमधील संघर्ष विकोपाला गेला आहे.

टि्वटर आणि भाजप यांच्यातील संघर्ष सुरु असतानाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावरुन भाजपला टोला लगावला आहे. याबाबत टि्वटचा लोगो टि्वट करीत आव्हाड म्हणतात, "चिमणी गिधाडांना भारी पडली!"

फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना २६ मेपर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक होते. या नियमावरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात वाद झाला.  

सरकारने आणि भाजपने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त केली. याबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरकडे नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी ट्विटरवर योग्य कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता.  त्यानंतर ट्विटरने आपली चूक दुरुस्त केली. 

एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हॅण्डलसमोर ब्लू टिक असेल पण नंतर त्याने कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण केले जात नसतील, तर ब्लू टिक हटवली जाते. उपराष्ट्रपती झाल्यापासून व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपतींच्या हॅण्डलचाच वापर करत आहेत. त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलचा वापर होत नसल्यामुळे ब्लू टिक काढून टाकण्यात आली असावी, असे सांगितले जात आहे.
 
Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख