वसईत एकाच दिवसात १२ जणांचा मृत्यू.. प्राणवायू न मिळाल्याने मूत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप - Twelve people died in a single day in Vasai due to lack of oxygen | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

वसईत एकाच दिवसात १२ जणांचा मृत्यू.. प्राणवायू न मिळाल्याने मूत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

चेतन इंगळे
मंगळवार, 13 एप्रिल 2021

उपचार दरम्यान  १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व मृत्यू हे प्राणवायू न मिळाल्याने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.  

वसई : वसई विरारमध्ये मागील दोन दिवसांपासून प्राणवायू चा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णालयातील उपचार घेत आलेल्या रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

सोमवारी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार दरम्यान  १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व मृत्यू हे प्राणवायू न मिळाल्याने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.  यातील ७ जण  हे नालासोपारा आचोळे येथील रिद्धीविनायका रुग्णालयात दगावले. तर ३ जण हे नालासोपारा रिद्धीविनायक रुग्णालयात मरण पावले तर इतर आणि एकाचा कृष्णा रुग्णालयात मृत्यू झाला. तर इतर दोन वसईच्या ग्रामीण भागात दगावले असल्याची माहिती मिळत आहे.  यातील सर्व रुग्ण हे प्राणवायू न मिळाल्याने दगावल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

 
वसई विरार मध्ये मागील दोन दिवसांपासून शहरात खाजगी रुग्णालयात तथा शासकीय रुग्णालयात प्राणवायूचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात दिवसागानिक कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. यात करोनामुळे रुग्णांना  श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना प्राणवायूची गरज लागते. यामुळे शहरातील प्राणवायूची मागणी प्रचंड वाढली आहे.

शहरात केवळ दोनच प्राणवायूचे वितरक असल्याने त्यांना वाढत्या मागणीच्या  प्रमाणात पुरवठा करणे शक्य न झाल्याने रुग्णालयात प्राणवायूचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यामुळे उपचारादाखल असलेल्या रुग्णांना प्राणवायू वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्या जीव धोक्यात सापडला आहे. अशा परिस्थितीत एकाच दिवसात १२ जणांचा मृत्यू झाल्याने शहरात हाहाकार माजला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विनायक रुग्णालयात सकाळी ६ ते ८ च्या दरम्यान ७ जण दगावले. या ठिकाणी नातेवाईकांनी रुग्णांना प्राणवायू न मिळाल्याचा आरोप केला आहे. यातील ६ जन हे कोविड वर उपचार घेत होते. तर एका जन संशियीत म्हणून दाखल झाला होता. तर सिद्धीविनायक रुग्णालयात २ जन हे कोविड ने दगावले तर एका इतर आजाराने मृत्यू झाला आहे. कृष्णा रुग्णालयात दगावलेला रुग्ण सुद्धा कोविड वर उपचार घेत होता. तर वसई ग्रामीण मधील रुग्ण सुद्धा करोना उपचारासाठी दाखल झाले होते.
 
या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. परंतु तुळींज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र काबले यांनी माहिती दिली की, रिद्धीविनायका रुग्णालयात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. पण तो प्राणवायू न मिळाल्याने झाला कि नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. पण पोलिसांनी प्राणवायू उपलब्ध करून देण्यास मदत केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख