राणेंना आस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंतांनीच शाल गळ्यात घालून केलं स्वागत

बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांना शिवसैनिकांचे हे वागणे अजिबात आवडले नसते.
 Narayan Rane, Trupti Sawant .jpg
Narayan Rane, Trupti Sawant .jpg

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा आज (ता. १९ ऑगस्ट) मुंबईत सुरु झाली आहे. 2015 मध्ये वांद्रे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंत यांनी गळ्यात शाल घालून राणे यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थान असलेल्या भागात नारायण राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्या म्हणून सावंत यांनी राणे यांचे स्वागत केले. राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे सध्या मुंबईतील वातावरण तापले आहे. (Trupti Sawant welcomed Narayan Rane) 

बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांना शिवसैनिकांचे हे वागणे अजिबात आवडले नसते, असे सावंत यांनी म्हटले. बाळासाहेब हेच आमचे दैवत आहे. आपला जुना शिवसैनिक मोठा होतो, याचे स्वागत व्हायला हवे. आमचे आणि बाळासाहेबांचे नाते अतूट आहे. ते कधीच संपणार नाही. आम्ही शिवसेनेपासून दुरावलो असलो तरी बाळासाहेबांपासून कधीच दुरावणार नाही, असे सावंत यांनी सांगितले.  

दरम्यान, नारायण राणे यांचे मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.     

यावेळी नारायण राणे म्हणाले, आज (ता. १९ ऑगस्ट) जनआशिर्वाद यात्रा निघते आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता जनता आताच्या सरकारला कटांळलेली आहे. हे सरकार या राज्याचा कुटल्याही प्रकारे विकास करु शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  नावाप्रमाणे या राज्याला उद्धवस्त करायला निघाले आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

यावेळी राणे म्हणाले, महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आण्यासाठी जनता आज उपस्थित आहे. एकच सांगतो महाराष्ट्राच्या जनतेच्या आशिर्वादाने हे पद आहे. राज्याचा विकास करता येईल. राज्याला देशाला विकासाकडे घेऊन जाता येईल. जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मी या मंत्रिमंडळात माझ्या विभागाचे काम करत असताना महाराष्ट्राचे नाव दिल्लीत केल्याशिवाय राहणार नाही, असेही राणे यांनी सांगितले. मला केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे, असेही राणे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com