परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण 

आत्तापर्यंत राज्य मंत्रिमंडळातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
Transport Minister Anil Parab infected with corona
Transport Minister Anil Parab infected with corona

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत राज्य मंत्रिमंडळातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील नऊ जणांनी कोरोनावर मात करत पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. परब हे सध्या उपचार घेत आहेत. 

मंत्री परब यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अगोदर ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. परंतु या सर्वांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. हे सर्व मंत्री सध्या राज्याच्या मंत्रिमडळात काम करीत आहेत. 

 Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com