संभाजीराजें शरद पवारांना म्हणाले, "मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्या.."

संभाजीराजे मराठा समाजाचे म्हणणं, त्यांची परिस्थिती जाणून घेत आहेत.
Sarkarnama Banner - 2021-05-27T112406.034.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-27T112406.034.jpg

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण maratha reservation रद्द केले आहे. त्यामुळे मराठा समाजात नाराजी आहे. मराठा समाजाची भावना जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे राज्याच्या दैाऱ्यावर आहेत. या दैाऱ्यात ते विविध पक्षांचे नेते, मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यक्रर्ते यांच्या भेटी घेणार आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांची भेट घेतली. संभाजीराजे Sambhaji Raje राज्यभर दौरा करुन मराठा समाजाचे म्हणणं, त्यांची परिस्थिती जाणून घेत आहेत.  told sharad pawar that he needed to take initiative on maratha reservation issue says sambhaji raje  

मुंबई येथे सिल्वर ओक येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी सकाळी साडेनऊ वाजता  संभाजीराजेंनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाबाबत सुमारे बारा ते पंधरा मिनिटे चर्चा झाली. मराठा आरक्षणप्रश्नी सर्वपक्षांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे शरद पवारांना सांगितल्याचे संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. उद्या संभाजीराजे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या विषयावर चर्चा करणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना ते उद्या सांयकाळी ४ वाजता पुण्यात भेटणार आहेत.  

“तुमचा भाऊ आणि बाप विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत,”..मोईत्रांचे रामदेव बाबांना प्रत्युत्तर  
 
संभाजीराजे म्हणाले, "मराठा समाजाची खदखद, त्यांची परिस्थिती शरद पवारांच्या कानावर घातली. या प्रश्नी तुम्ही पुढाकार घेण्याची गरज असल्याचं त्यांना सांगितलं. तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे, हे शरद पवारांना सांगितलं. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे या सगळ्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यायला हवी. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि सकारात्मक दृष्टीकोन दाखवला.   

राजकीय नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजे मराठा आरक्षणाबाबत पुढे काय करायचं, याबद्दल आपली भूमिका मांडणार आहे. त्यामुळे या भेटींकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर रस्त्यावर येऊन मोर्चा, आंदोलन करण्याचा इशारा काही मराठा संघटनांनी दिला आहे. परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता आंदोलन, मोर्चे टाळण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com