आज तुमची सत्ता आहे, उद्या आमची असेल, फक्त इतकी आठवण ठेवा ! नितीश राणेंचा इशारा - Today is your day, tomorrow will be ours, just remember that! Nitish Rane's warning | Politics Marathi News - Sarkarnama

आज तुमची सत्ता आहे, उद्या आमची असेल, फक्त इतकी आठवण ठेवा ! नितीश राणेंचा इशारा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

राणे यंनी आज केलेले ट्विट हिंदीत होते.

मुंबई : सत्ता आज आहे, उद्या नाही. आज तुमची सत्ता आहे, उद्या आमची असेल. फक्त इतकीच आठवण ठेवा असा इशारा भाजपचे आमदार नितीश राणे यांनी आज दिला आहे. 

गोस्वामी यांच्या अटकेनंतर देशभर आरोपप्रत्योरोप सुरू आहे. काहीजण गोस्वामी यांची बाजू घेत आहेत तर काहीजणं त्यांना विरोध करीत आहे. गोस्वामींवरील कारवाईनंतर कॉंग्रेस, भाजप,शिवसेनेसह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी ट्विट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राणे यंनी आज केलेले ट्विट हिंदीत होते. त्यांनी म्हटले आहे, की सत्ता आज आहे, उद्या नसेल, आज तुमची आहे. उद्या आमची असेल. फक्त इतकी आठवण ठेवा, की हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगा के. हे ट्विट करताना मात्र त्यांनी कुठेही गोस्वामींचा उल्लेख केलेला नाही. 

काय आहे प्रकरण ! 

इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या 2018 मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला आहे. पोलिस अर्णब यांना घेऊन अलिबागकडे रवाना झाले आहेत. 

आज सकाळीच सुमारे डझनभर पोलिस अर्णब यांच्या निवासस्थानी गेले. तेथून त्यांना अक्षरशः उचलून पोलिस व्हॅनमध्ये कोंबण्यात आल्याचा आरोप रिपब्लिक टिव्हीने केला आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख