Time will tell whether Nathabhau will get a limlet pill or Cadbury's: Chandrakant Patil
Time will tell whether Nathabhau will get a limlet pill or Cadbury's: Chandrakant Patil

नाथाभाऊंना, लिमलेटची गोळी की कॅडबरी मिळणार, हे काळ ठरवेल : चंद्रकांतदादा 

जयंत पाटील त्यांना काय देतात ते बघूयात.

मुंबई : "राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करताना एकनाथ खडसे यांना काय द्यायचे, हे ठरलं नाही. "तुमचे समाधान होईल,' असे देऊ म्हटल्यावर तेवढ्यावरच नाथाभाऊ बळंबळं नरीमन पॉईंटच्या फ्लॅटबाहेर पडले. खडसेंच्या समाधानासाठी ते आता लिमलेटची गोळी की कॅडबरी देतात, हे काळ ठरवेल. जयंत पाटील त्यांना काय देतात ते बघूयात,' असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांना लगावला. 

भारतीय जनता पक्षाचे राजीनामा दिलेले एकनाथ खडसे यांनी आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर माध्यमाशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी वरील टिका खडसे यांच्यावर केली. 

पाटील म्हणाले की, खडसे यांचा दुपारी दोन वाजता प्रवेशाचा कार्यक्रम ठरला होता. मग तो दुपारी चारपर्यंत का लांबला, हे जयंत पाटील यांनी सांगावे. नाथाभाऊंना काय द्यायचं, हे ठरलं नाही. जयंत पाटील हे काय देताहेत हे बघूयात. "तुमचे समाधान होईल, असे देऊ एवढ्यावरच नाथाभाऊ घराबाहेर पडले. आता बघू त्यांना कायम मिळते, हे काळच ठरवेल. 

एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार आरोप करीत आहेत. त्याबद्दल चंद्रकांतदादा म्हणाले की, एकट्या देवेंद्र फडणवीस यांना नाथाभाऊंनी टार्गेट करणं बरोबर नाही. भाजपचे निर्णय सामूहिक असतात. त्यामुळे त्यांनी फडणवीसांवर टीका करणे योग्य वाटत नाही. 

राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने आज दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार जिरायतसाठी प्रतिहेक्‍टरी 10 हजार, तर बागायतीसाठी 25 हजार रुपये मदत दोन हेक्‍टरपर्यंत मिळणार आहे. त्यावर टिका करताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार. ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. या पॅकेजमध्ये भरीव असे काहीच नाही. हे केवळ पोकळ पॅकेज आहे. 
Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com