...या मुद्यांवरुन अधिवेशनात होणार खडाजंगी - These issues will be discussed in the assembly session | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

...या मुद्यांवरुन अधिवेशनात होणार खडाजंगी

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

या मुद्यावरुनही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : विधानसभेचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन (Assembly Session) आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कृषी कायदे, मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षण (OBC Reservation) हे महत्त्वाचे विषय, असणार आहेत त्याच बरोबर विधानसभा अध्यक्ष निवडणूक हाही महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. या मुद्यावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारला घेण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या मुद्यावरुन अधिवेशनात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. (These issues will be discussed in the assembly session) 

...तर रामदास आठवले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते!

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दुसरा विषय केंद्र सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, ती याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने पुढाकार घेत मराठा आरक्षण द्यावे, हा ठराव मांडला जाणार आहे.

ओबोसी आरक्षण मिळावे यासाठी इम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरनाने द्यावा, याबाबतचा ठराव अधिवेशनात मांडला जाणार असल्याची माहिती आहे. या मुद्यावरुनही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.

नांगरे पाटील, तुकाराम मुंढे, भरत आंधळे यांनीच आता पुढे यावे...

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीत महाविकास आघाडीला घेरण्याचा विरोधी भाजपची योजना आहे. या अधिवेशनात दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. त्यामुळे अध्यपदाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनात सरकारला घेण्यासाठी सभागृह सुरु होण्याआधी भाजप आमदारांची बैठक होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची बैठक होणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख