ठाकरे सरकारकडून क्रिमिनल  व्यक्तींचा वापर...सोमय्यांचा आरोप...  - Thackeray government using criminals for political purposes Kirit Somaiya  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

ठाकरे सरकारकडून क्रिमिनल  व्यक्तींचा वापर...सोमय्यांचा आरोप... 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मुंबई  : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरण यांच्या मृत्यूचा तपास राष्ट्रीय तपाय यंत्रणा (एनआयए) करीत आहे. या तपासात रोज नवीन खुलासे होत आहेत. या तपासावरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

किरीट सोमय्या म्हणाले की, आधी  शिवसेनेचे  प्रवक्ते  सचिन  वाझे  व शिवसेनेचे 2019 चे उमेदवार  प्रदिप  शर्मा यांची चौकशी सुरू आहे. हळू हळू  हे प्रकरण  आयपीएस अधिकारी, अनिल  देशमुख  आणि मग  मुख्यमंत्री कार्यालयाच्या दारात पोहचणार आहेत सचिन वाझे  टीमची  दोन हजार कोटींची  वसुली, मनसुख हिरेन यांची  हत्या, यात  सगळ्यांचा  काय  हात  होता  हे लवकरच कळेल.. क्रिमिनल  व्यक्तींचा  राजकीय  हेतूसाठी वापर करणे हे  ठाकरे  सरकारने सिद्ध  केले आहे.

एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे प्रकरणात  राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काल रात्री वाझेला लोकलवारी घडवली.  काल रात्री सव्वाअकरा ते दोन वाजेपर्यंत त्याची कारवाई सुरू होती. ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची ४ मार्चला हत्या झाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरने यांच्या मृत्यूचा तपास राष्ट्रीय तपाय यंत्रणा करीत आहे.  मनसुख हिरेन हत्येच्या दिवशी ४ मार्चच्या रात्रीचा सर्व घटनाक्रमाचा एनआयएने उलगडा केला आहे. काल  हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेची सीएसएमटी ते कळवा लोकलवारी  एनआयएने घडविली. एनआयएनने सीआययूच्या कार्यालयापासून हत्या करून परत मुंबईत येईपर्यंतच्या वाझेच्या गुन्ह्याच्या कृत्याचे नाट्यरूपांतर  (क्राइम सीन रिक्रिएट) केले.  मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी सचिन वाझे याने लोकलने प्रवास केल्याचे उघड झाले आहे. लोकलच्या गर्दीत ओळख पटणं कठीण असल्याने वाझे याने मोबाईल ऑफिसमध्ये ठेवून ठाण्याला लोकलने गेल्याचे तपासात समोर आले आहे.  

राष्ट्रीय तपास यंत्रणेने मात्र मनसुख हिरेन हत्या प्रकरणात कुणा कुणाचा सहभाग आहे. त्या दिवशी कोण कोण घटनास्थळी होत. वाझेचा रोल त्यात काय, याचा तपास  एनआयए करत आहे. हिरेन यांची हत्या ही गायमुख जवळील परिसरात केल्यानंतर त्यांचा मृतदेह हा मुंब्रा खाडी परिसरात टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाल्याचे म्हटलेले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख