ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केली, राम कदमांची टीका 

सुशांतसिंह प्रकरणावरून भाजप विरूद्ध शिवसेना असा सामानात रंगला आहे.
ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केली, राम कदमांची टीका 

मुंबई : सुशांतसिंह प्रकरण ठाकरे सरकार सीबीआयकडे का सोपवित नाही असा सवाल करतानाच या सरकारने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केली अशी टीका भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी आज केली आहे. 

सुशांतसिंह प्रकरणावरून भाजप विरूद्ध शिवसेना असा सामानात रंगला आहे. वास्तविक हे प्रकरण सीबीआयकडे द्यायला ठाकरे सरकार तयार नाही. अशातच शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने शिवसेनेचा पारा चढत चालला आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी तर भाजपला खुले आव्हान दिले आहे. ते म्हणाले, की भाजपमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी जाहीरपणे आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन दाखवावे. राऊस यांच्या या आव्हानावर राम कदम यांनी त्यांच्यावर टीका केली. 

ठाकरे सरकारने त्यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप कदम यांनी केला. ते म्हणाले, की शिवसेना हे प्रकरण सीबीआयकडे का देत नाही? वास्तविक ठाकरे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी खुद्द या पक्षाचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. नव्या पिढीचे हे विचार आहेत ते समजून घेतले पाहिजेच असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. 

शिवसेनेला डिवचण्याचे काम नेहमीच राम कदम करीत असतात. आजही त्यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. अजित पवारांच्या पुत्र पार्थ यांचा उल्लेख करून शिवसेनेवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. 

सुशांत सिंहप्रकरणी केंद्राकडून अधिकृत सूचना मिळाल्यानंतर सीबीआयने तपास सुरु केला. बिहार सरकारने विनंती केल्यानंतर तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला. सुशांत सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे बिहार पोलिसांनी अभिनेत्री आणि कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

सीबीआयने एकूण सहा जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्यूअल मिरांडा, श्रुती मोदी यांचा समावेश आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com